One more suicide for Maratha reservation | Sarkarnama

घनसावंगी तालुक्यात मराठा आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या

तुकाराम शिंदे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीये. अंतरवाली टेंभी  येथील गणेश तुकाराम नन्नवरे हे शनिवारी (ता.11) रात्री सात ते आठच्या दरम्यान शेतात गेला होते. परंतु रात्री ते परत आलेच नाही.

तीर्थपुरी: घनसवांगी तालुक्यातील अंतरवाली टेंभी येथील गणेश तुकाराम नन्नवरे ( वय ४०) या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी  शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता.१२) पहाटे सहा वाजेच्या सुमारास उघडीस आली. 

मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आत्महत्या करणाऱ्यांचे प्रमाण काही केल्या कमी होत नाहीये. अंतरवाली टेंभी  येथील गणेश तुकाराम नन्नवरे हे शनिवारी (ता.11) रात्री सात ते आठच्या दरम्यान शेतात गेला होते. परंतु रात्री ते परत आलेच नाही.

 त्यामुळे त्यांचे बंधू पाराजी नन्नवरे सकाळी त्याला पाहण्यासाठी शेतात गेले असता, गणेश नन्नवरे शेतात मृत अवस्थेत आढळून आले. त्याने विष प्राशन केले असल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती गावात कळताच नागरिकांनी घटनाथळकडे धाव घेतली. त्यांच्या खिशात आरक्षणाच्या मागणीबाबत चिट्टी आढळून आली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख