olanda clear about rafale | Sarkarnama

ओलांदच्या खुलाशानंतर चर्चेची गरज नाही 

वृत्तसंस्था
सोमवार, 24 सप्टेंबर 2018

लखनौ: फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्या खुलाशानंतर राफेल करारावर पुन्हा चर्चेची गरज नाही, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसकडून या कराराला अकारण वादाचे रूप दिले जात असल्याचीही टीका राजनाथसिंह यांनी केली.
 
पत्रकार परिषदेत बोलताना राजनाथसिंह म्हणाले, की राफेल कराराबाबत फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलांद यांच्याकडून खुलासा आला आहे. आता या कराराबाबत कोणतीही शंका असण्याचे कारण नाही. आगामी लोकसभा निवडणुकीत लाभ मिळण्यासाठी कॉंग्रेस पक्ष अकारण या मुद्द्यावरून वाद निर्माण करत आहेत. 

विरोधकांकडे आता कोणताच मुद्दा नसल्याने राफेल करारावरून नागरिकात संभ्रम निर्माण केला जात आहेत. काश्‍मीर प्रश्‍न वाढत नसून त्यावर तोडगा निघू शकतो, अशा विश्‍वासाचे वातावरण झाले आहे. आम्ही सर्वांशी बोलण्यासाठी तयार आहोत. दहशतवाद्यांसदर्भात सुरक्षा दल समन्वयाने काम करत असल्याचे राजनाथसिंह म्हणाले. काश्‍मीरमधील दहशतवादाला पाकिस्तानचे पाठबळ असल्याचा आरोपही राजनाथसिंह यांनी केला.  
 
संबंधित लेख