oil hike satara band on monday | Sarkarnama

इंधन दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी सातारा जिल्हा बंद 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 8 सप्टेंबर 2018

सातारा : इंधन दरवाढ व मोदी सरकारच्या निषेधार्थ सोमवारी (ता. 10) सातारा जिल्हा बंदची हाक राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे. 

यासंदर्भात राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती कमी होऊनही आपल्याकडे मात्र पेट्रोल व डिझेल च्या किमती दररोज वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची सातत्याने घसरण होत आहे, तसेच शेतकरी विरोधी धोरणामुळे गेल्या चार वर्ष्यात एकही पिकाला हमीभाव एवढा दर मिळालेला नाही. 

या सर्व गोष्टी सर्वसामान्यांच्या लक्ष्यात आल्या आहेत. त्यामुळे सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाने येत्या सोमवारी (ता. 10) सातारा जिल्हा बंदची हाक दिली आहे. या बंद मध्ये सातारा जिल्ह्यातील सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार शिंदे यांनी केले आहे. या बंद मधून अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 
 
संबंधित लेख