officers transfer | Sarkarnama

वित्त आणि उत्पादन शुल्कमधील  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या 

सरकारनामा ब्युरो 
गुरुवार, 1 जून 2017

मुंबई : महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक दर्जाच्या 26 अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या. ज्या अधिकाऱ्यांचे तीन वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे. अशा अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. 

मुंबई : महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा उपसंचालक दर्जाच्या 26 अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या करण्यात आल्या. ज्या अधिकाऱ्यांचे तीन वर्षे कालावधी पूर्ण झाला आहे. अशा अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे. 
नागपूर येथील कोषागार कार्यालयातील वरिष्ठ कोषागार मोना ठाकूर , सोलापूर जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे मुंबई संचालनालय उपसंचालक अनघा वैद्य, पुणे कोषागार कार्यालयातील वरिष्ठ कोषागार अधिकारी संजय राजमाने, पिंपरी चिंचवड महानगर प्राधिकरणाचे उपसंचालक रमेश कुलगोड, उल्हासनगर महापालिका मुख्य लेखा अधिकारी दादासाहेब पाटील भिंवडी महापालिका मुख्य लेखा परिक्षक,विनोद शिंगटे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उपसंचालक तानाजी धायगुडे अमरावती जिल्हा परिषद मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे,उल्हासनगर महापालिका मुख्य लेखापरिक्षक सुखदेव बलमे,जालना जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी जिजा चव्हाण, नागरी पुरवठा विभागाचे कृष्णा इंद्रेकर, राज्य लॉटरी विभागाच्या उपसंचालक स्मिता कुलकर्णी , अमरावती कोषागार कार्यालयाच्या गिता नागर , अमरावती कोषागार कार्यालयाच्या व्यकंट जोशी , चंद्रपूर महापालिकेचे देवानंद मेश्राम, नवी मुंबई महापालिकेचे वरिष्ठ कोषागार नितीन पाठक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मारुती कांबळे, अकोला महानगर पालिकेचे मुख्य लेखा परिक्षक सुरेश सोळसे, औरंगाबाद कोषागार कार्यालयातील वंदना जोशी, औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी उत्तम चव्हाण, नागपूर महापालिकेतील मुख्य लेखा परिक्षक आमोद कुंभोजकर यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. 

दरम्यान,नागपूर महापालिकेतील मुख्य सेवा व लेखा अधिकारी मदन गाडगे, ठाणे महापालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी सुधीर नाकाडी यांना सेवानिवृत्तीसाठी एक वर्षासाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने त्यांना या पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे. तर पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधनीच्या सहयोगी प्राध्यापिका दिपा सडेकर यांना प्रशासकीय कारणास्तव एक वर्ष मुदतवाढ देण्यात आली आहे. 

राज्य उत्पादनमधील 12 अधीक्षकांच्या बदल्या 
राज्य उत्पादन शुल्क विभागाचनया अधीक्षक दर्जाच्या 12 अधिकाऱ्यांच्या बुधवारी बदल्या झाल्या. रायगड अधिक्षक निलेश सांगडे यांची गोंदिया, सोलापूरचे अधिक्षक सागर धोमकर यांची चंद्रपुर, नगरचे अधिक्षक भागश्री जाधव यांची जालना, नाशिकचे अधीक्षक रवींद्र आवळे यांची सोलापूर, औरंगाबादचे अधीक्षक चरणसिंग राजपुत यांची नाशिक, लातूरचे अधीक्षक केशव राऊत यांची हिंगोली, नांदेडचे अधीक्षक गणेश पाटील यांची कोल्हापूर, बीडचे अधीक्षक संध्याराणी देशमुख यांची रत्नागिरी, हिंगोलीचे अधीक्षक किर्ती शेडगे यांची सांगली, जालनाचे अधीक्षक सीमा झावरे यांची रायगड , गोंदियाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांची बीड आणि यवतमाळचे अधीक्षक पराग नवलकर यांची नगर येथे बदली करण्यात आली आहे. 
 

संबंधित लेख