officers clarify to girish mahajan | Sarkarnama

उंदीर, घुशींमुळे मुठा कालव्याला भगदाड : अधिकाऱ्यांचा मंत्र्यांकडे खुलासा

उमेश घोंगडे
शुक्रवार, 28 सप्टेंबर 2018

पुणे : खडकवासला कालव्याच्या सीमाभिंतीला उंदीर-घुशीमुळे भगदाड पडल्याचे सांगण्यात येत असले तरी, चौकशी करूनच निष्कर्ष काढणे योग्य ठरेल. यासाठी पाटबंधारे खात्याच्या मुख्य अभियंता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. दोन दिवसात तो अहवाल प्राप्त होईल. त्यामध्ये कोणी दोषी असतील, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशी घोषणा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शुक्रवारी केली. 

दांडेकर पुलाजवळ काल सकाळी उजवा मुठा कालव्याची सीमाभिंत कोसळल्याने भगदाड पडल्याने या संपूर्ण परिसरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यामध्ये सुमारे पाचशे घरांचे नुकसान झाले. महाजन यांनी आज घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. महापौर मुक्ता टिळक, आमदार माधुरी मिसाळ, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, नगरसेवक शंकर पवार, महेश वाबळे यांच्या पाटबंधारे आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते. 

या घटनेत जी कुटुंबे बाधित झाली आहेत. त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. ते पूर्ण झाल्यानंतर राज्य सरकारच्या नियमानुसार बाधित लोकांना मदत करण्यात येईल, असे सांगून महाजन म्हणाले,"" कालव्यांच्या दोन्ही बाजूस अतिक्रमणे झाली आहेत. त्यांच्यावर कारवाई झाल्यानंतर पुन्हा लगेचच अतिक्रमण होतात. आता ती पुन्हा होणार नाहीत, याची काळजी घेण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख