शिवसेना नगरसेवकास अधिकाऱ्याच्या भावाची धमकी  : ठोकून टाकील !

शिवसेना नगरसेवकास अधिकाऱ्याच्या भावाची धमकी  : ठोकून टाकील !

औरंगाबाद:  "माझ्या भावाच्या डोक्‍याला का बर ताप देतो, रविंद्र निकममाझा भाऊ आहे, जास्त ताण देवू नको, नाहीत ठोकून टाकील," अशा भाषेत मनपाउपायुक्त रविंद्र निकम यांचा भाऊ मंगेश निकम याने शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना फोनवरून धमकावले. 

जंजाळ यांच्या प्रमाणेच राजूवैद्य व भाजपचे नगरेसवक प्रमोद राठोड यांना देखील निकम  याने धमकावल्याची माहिती आहे. धमकीचा हा फोन सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

शिवसेनेचे शिवाजीनगर वार्डातील नगरसेवक व भारतीय विद्यार्थी सेनेचे महाराष्ट्र निमंत्रक राजेंद्र जंजाळ यांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याचा प्रकार आज  उघडकीस आला. फोनवरुन ठोकून टाकण्याची धमकी देणारी व्यक्ती आपण मनपा उपायुक्त रविंद्र निकम यांचे भाऊ असल्याचे सांगत होती.

माझ्या भावाच्या डोक्‍याला ताण देवू नको, नाहीत ठोकून टाकीन, मजेत राहयचं नाही तर ठोकून देईन अशी धमकी फोनवरुन मंगेश निकम याने जंजाळ यांना दिली. 

यावर "ये मी तुझी वाट पाहतो, कधी येतो ", असे प्रतिउत्तर देत जंजाळ यांनी देखील धमकावणाऱ्याला खुले आव्हान दिले. धमकावणारा मंगेश निकम हा स्वःताला भारिप बहुजन महासंघाचा जिल्हा संघटक असल्याचे धमकावतांना सांगत
होता.

मी धमक्‍यांना घाबरत नाही

"मी शिवसेनेचा नगरेसवक आहे, अशा धमक्‍यांना भीक घालत नाही. ठोकून टाकण्याची भाषा करणाऱ्या मंगेश निकमच्या मी घरी जाऊन आलो, पण तो इतकी दारू पिलेला होता, की त्याला उभ राहता येत नव्हत. दारुच्या नशेतच त्याने राजू वैद, प्रमोद राठोड यांना देखील फोन केले होते.

महापालिकेतील एखादा उच्चपदस्थ अधिकारी कुठल्या थराला जाऊ शकतो हे या घटनेवरुन स्पष्ट होते. उपायुक्त रविंद्र निकम यांच्या भ्रष्टाचाराचे वाभाडे आम्ही काढणार म्हणून त्याने हा प्रकार केला. सर्वसाधारण सभेत हा मुद्दा मी मांडणार आहे. शिवाय
या प्रकाराची तक्रार देखील जवाहरनगर पोलीसाकडे दिली आहे."
असे नगरेसवक राजेंद्र जंजाळ यांनी सांगितले . 

भारतीय विद्यार्थी सेनेचे सुरुवातीपासून काम करणारे राजेंद्र जंजाळ हेमहापालिकेत सभागृहनेते देखील होते. माजी खासदार व महानगरप्रमुख प्रदीपजैस्वाल यांचे कट्टर समर्थक अशी देखील जंजाळ यांची ओळख आहे. राजकीय किंवा खाजगी कार्यक्रमात बाऊन्सर पुरवण्याचे तसेच बॅंकांच्या कर्जवसुलीचे कामजंजाळ पाहतात. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com