Offence Registered Against Udayanraje and Shivendraraje | Sarkarnama

उदयनराजे, शिवेंद्रसिंहराजेसह 70 समर्थकांवर गुन्हा दाखल

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

काल साताऱ्यात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांनी जमावबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आणि त्यांच्या 70 ते 75 समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच दारू दुकानाचे मालक रवींद्र ढोणे यांनी खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या सहा समर्थकांविरोधात जबरदस्तीने दारू दुकान बंद करायला लावण्याची तक्रार दिली आहे.

सातारा : जुना मोटार स्टँड येथील भाड्याने असलेल्या देशी दारूचे दुकान काढण्यावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह सहा समर्थकांवर तसेच जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोन्ही राजांसह 70 ते 75 समर्थकांवर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

काल साताऱ्यात झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाहूपुरी पोलिसांनी जमावबंदी आदेश भंग केल्याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आणि त्यांच्या 70 ते 75 समर्थकांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच दारू दुकानाचे मालक रवींद्र ढोणे यांनी खासदार उदयनराजे भोसले व त्यांच्या सहा समर्थकांविरोधात जबरदस्तीने दारू दुकान बंद करायला लावण्याची तक्रार दिली आहे. ''दुकान बंद करा नाहीतर दुकान फोडीन, मी दुकान फोडायला आलोय, तू गाडीत बसून निघून जा. नाहीतर तुझी गाडी फोडीन, तुझ्या शिवेंद्रला बोलाव कोणीबी येऊ दे तुझे दुकान पडणारच. तुझे दुकान बंद करा नाहीतर तुला खल्लास करीन," अशी धमकी उदयनराजे यांनी दिल्याचे ढोणे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. 

त्यानुसार पोलिसांनी गर्दी मारामारी  या आरोपाखाली भा. द. वी कलम 143,149, 506 नुसार खासदार उदयनराजे भोसले, समीर खुटाळे, सत्यजित खुटाळे, केदार राजेशिर्के, महेश शिंदे, मयूर चिकणे, पद्माकर खुटाळे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

2019 सार कुणाला लाभदायक ठरणार - वाचा सरकारनामा दिवाळी अंक - येथे क्लिक करा आणि आजच सवलतीच्या दरात मागणी नोंदवा

संबंधित लेख