ओबीसी, एससी, एसटी एकत्र आले तर इतरांची "दांडी गुल' : छगन भुजबळ 

ओबीसी, एससी, एसटी एकत्र आले तर इतरांची "दांडी गुल' : छगन भुजबळ 

मुंबई : संविधान वाचले तर ओबीसी समाज वाचेल. शिवाय आरक्षणातील 54 टक्के ओबीसी व 20 टक्के एस.सी. व एस.टी एकत्र आले तर 75 टक्के होतात. या सर्वाचे ऐक्‍य झाले तर बाकी सर्वांची दांडी गुल होईल. अशी भूमिका माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. 

ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ओर्गनायझेशनच्यावतीने संविधान सम्मान संमेलन मरीन लाईन येथील बिर्ला हाऊस येथे आयोजित केले होते. त्यावेळी भुजबळ बोलत होते. कार्यक्रमास पशु व दुग्धविकास मंत्री महादेव जाणकर, ऑल इंडिया ओबीसी ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अंसारी उपस्थित होते. 

संविधानातून सर्वांना समान अधिकार देण्यात आल्याचे स्पष्ट करताना भुजबळ म्हणाले की, मंडल आयोगाची लढाई मोठी होती ती आपण सर्वजण लढलो. मंडल आयोगाने ओबीसींना आरक्षणाच्या कक्षेत आणले. जर आरक्षणातील 54 टक्के लोक एकत्र आले आणि त्यांना 20 टक्के एस.सी व एस.टीचे 
पाठबळ मिळाले त्यांची एकत्रपणे टक्‍केवारी 75 होते. हे 75 टक्‍के समाजाचे ऐक्‍य झाल्यास इतर सर्वांची दांडी गुल होईल. 

दरम्यान, राज्य शासनात फक्त 09 टक्के ओबीसी लोक नोकरी करत आहे. 1931 मध्ये ब्रिटीशांनी जनगणना केली त्यात 52 टक्के ओबीसी आहेत तरी सुद्धा ओबीसींना फक्‍त 27 टक्के आरक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे ओबीसी जनगणना व्हावी यासाठी आम्ही भांडत आहोत. केंद्र शासन ओबीसी साठी अनुकून आहे पण त्याच्या कडे ओबीसी चा डाटा नाही मग कसे मदत करणार ? असा प्रश्न भुजबळ यांनी उपस्थित केला. 

ओबीसी जनगणना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच सरकारमध्ये होऊ शकते असा दावा मंत्री जानकर यांनी केला. तर हिंदू मुस्लिम ओबीसी एकत्र आले तर सत्ता बदलू शकतो असे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ओर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अंसारी म्हणाले. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com