OBC Ministry is not even on papers yet ! | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

ओबीसी मंत्रालय कागदावरही नाही ! 

 सरकारनामा ब्यूरो
सोमवार, 24 जुलै 2017

मुंबई  : मोठा गाजावाजा करत ओबीसी मंत्रालय स्थापन केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय आधिवेशात केली होती. त्याचा स्वतंत्र कार्यभार जलसंधारण मंत्री राम शिंदे यांच्याकडे सोपवण्यातही आला आहे.

मात्र, पावसाळी आधिवेशनाच्या पुरवणी मागण्यांमध्ये ओबीसी विभागाचा साधा उल्लेखही नसल्याची धक्कादायक बाब निदर्शनास आली आहे. त्यामुळे इतर मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी मंत्रालय कागदवरही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. 

यापुर्वी सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत असेलल्या इतर मागासवर्गीय विभागाचे स्वतंत्र मंत्रालय करण्याचे अाश्वासन 2014 च्या विधानसभा निवडणुकीत  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. त्यानुसार राज्यात स्वतंत्र ओबीसी खात्याची निर्मिती केली. सुरवातीला या विभागाचे कामकाज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. 

कालांतराने याचा कार्यभार जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आला असून जे. पी. गुप्ता यांची खात्याचे सचिव म्हणून नियुक्‍ती करण्यात आली आहे. याबाबत सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता. त्यांनी या घोषणा झाल्याचा दुजोरा देत पुरक मागण्यांमध्ये उल्लेख नसल्याची कबूली दिली. 

राज्यातील ओबीसी समाजाच्या मतांकडे डोळा ठेवून जिल्हा परिषद व महापालिका निवडणुकीच्या तोंडावर स्वतंत्र मंत्रालयाची घोषणा केल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळे आता पुरवणी मागण्यातही ओबीसी विभागाचा समावेश सामाजिक न्याय विभागातच करून ओबीसी मंत्रालय कागदावरही नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे विरोधकांच्या आरोपांना पुष्टी देण्याचे काम या प्रकारणातून झाले आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित लेख