obc appose maratha reservation | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

ओबीसींचे आरक्षण मराठ्यांना देण्यास विरोध ; 

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 31 जुलै 2018

मुंबईः मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी विरोध दर्शविला आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी ही भूमिका मांडली. 

मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करणारा गोखले इन्स्टिट्यूटचा अहवाल फक्त विदर्भ आणि मराठवाडा भागातील दाखला देत तयार केला आहे. त्या आकडेवारीवरून संपूर्ण महाराष्ट्राचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही. मराठा समाजातील कष्टकरी, माथाडी कामगार, ऊसतोड कामगार आदींचा अभ्यास केल्याचे आढळते; पण बागायतदार, संचालक, राजकारणी, व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार यांचा उल्लेख कुठेच आढळत नाही. 

आम्हाला दिलेली आकडेवारी आणि सरकारच्या आकडेवारीत खूप तफावत आहे. अशा अनेक त्रुटी या अहवालात आढळत असल्याने तो योग्य वाटत नसल्याचा दावा कोकरे यांनी केला. याआधीही राज्य मागासवर्ग आयोगाने खत्री आयोग, सराफ आयोग, बापट आयोग असे तीन अहवाल दिले; पण त्यांच्या निर्णयाचा उल्लेखही सरकारी शपथपत्रात नाही. याउलट आयोगाच्या अहवालातील माहिती चुकीच्या पद्धतीने मांडली असल्याचे कोकरे यांनी सांगितले.
 
संबंधित लेख