now will release one audio clip daily : Munde | Sarkarnama

आता रोज एका मंत्र्याची क्लिप बाहेर काढणार : धनंजय मुंडेंचा पलटवार

ब्रह्मा चट्टे
गुरुवार, 1 मार्च 2018

मुंबई : सत्ताधाऱ्यांनी मला हरवण्याचा प्रयत्न केला पण मी आज जिंकलोय. मी ज्या पद्धतीने सरकारविरोधात आवाज उठवतोय ते सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात खुपतंय म्हणून असे आरोप माझ्यावर केले जात असल्याचे स्पष्टीकरण धनजयं मुंडे यांनी विधान परिषदेत दिले. आता सरकारच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची रोज एक क्लिप मी सभागृहात सादर करणार, असा इशारा त्यांनी दिला.

प्रश्न विचारण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप धनजंय मुंडे यांच्यावर केले गेले होते. त्यामुळे धनंजय मुंडे हे यावर काय स्पष्टीकरण देतात, याची उत्सुकता होती. 

मुंडे म्हणाले, " २८ फेब्रुवारी २०१८ रोजी एका वृत्तवाहिनीवर माझ्याबाबतीत बातमी दाखवली गेली. विधिमंडळात दलाली सुरू आहे असा आरोप केला गेला. ही गोष्ट विधिमंडळाची बदनामी करणारी आहे. सभागृहाने या विरोधात आवाज उठवणे गरजेचे होते मात्र तसे झाले नाही अशा खालच्या पातळीचे राजकारण सध्या राज्यात सुरू आहे. याची सुरुवात कोणीही केली असेल पण याचा अंत मात्र विरोधी पक्ष करणार असल्याचा निर्धार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला. 

धनंजय मुंडे पुढे म्हणाले, " मी या प्रकरणाच्या खोलाशी मी गेलो आहे. मी बातमी कोणी सोडली, कशी सोडली, ती व्यक्ती कोण कोणाला भेटली हे सर्व मला माहिती आहे. आता यापुढे मी रोज एका मंत्र्याच्या भ्रष्टाचाराची बाहेर क्लिप काढणार आहे. यासंबंधी ही लक्षवेधी सुचना आहे २०१६ मधली आहे. जर मी पैसे घेतले असतील तर २०१७ मध्ये याच लक्षवेधीबाबत तारांकीत प्रश्न कसा उपस्थित झाला ? मी काल दुपारपासून माझ्या शासकीय निवसस्थानी होतो मात्र या चँनेलच्या एकाही प्रतिनिधीने मला याबाबत मी विचारणा केली नाही याचे दुखः वाटतं.``

ऐवढ्या क्षुल्लक कारणावरून आज मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. मी सरकारमधील अनेक मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले. जर माझ्यावरील आरोप खरच खरे असते तर तुम्ही मला आज जेलमध्ये टाकले असते. मी जे काही करतो ते इमानदारीने करतो बदनामी करत नाही. जर इमानदारीने काम करूनही माझ्यासोबत असं राजकारण होत असेल तर लोकशाही आहे की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होतो आहे. या सभागृह मी प्रत्येक मंत्र्यांना अडचणीत आणले आहे कदाचित हाच राग मनात असल्याने माझ्यावर हे आरोप केले गेले आहेत. तुम्ही हजार अग्नीपरीक्षा घ्या मी त्या अग्नीपरीक्षेला सामोरे जाईल. मला निलंबीत करा मला काही परवा नाही मात्र मी आतापर्यंत या सभागृहात जेवढे आरोप केलेत त्याची ओपन चौकशी व्हायला हवी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली.

आज पासून सरकारमधील भ्रष्टाचार उघड करण्याची सिरीज सुरू करत आहे, असे सांगून धनंजय मुंडे म्हणाले, " ग्रामविकास मंत्र्यांनी पीए २५-१५च्या कामासाठी ५० लाखाची लाच मागतली. त्याच्या संभाषणाची क्लिप सभागृह देत आहे. विरोधी पक्षनेता या नात्याने माझी बांधिलकी ही राज्यातील १२ कोटी जनतेशी आहे त्यामुळे मी माझा लढा सुरु झाली आहे, असे त्यांनी सांगितले.

संबंधित लेख