मराठा समाजाने कायम औदार्य दाखवले; आता तुम्ही दाखवा 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मराठा क्रांती मोर्चाचे वातावरण पेटविण्यात पुढाकार घेतला होता. मराठा आमदारंचे शिष्टमंडळ घेऊन ते मुख्यमंत्र्यांना भेटले. विधान परिषदेत मराठा आरक्षणाच्या मुद्यावर फडणवीस सरकारने श्रेय घ्यावे, पण आरक्षण द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
मराठा समाजाने कायम औदार्य दाखवले; आता तुम्ही दाखवा 

मुंबई : "महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर ज्यांची सत्ता राज्यात आली त्यांनी राज्यातील सर्व उपेक्षित घटकांना देताना मराठा समाजाने कायम सहकार्य केले, कधीही विरोध केला नाही, त्यामुळे आता आमच्यासारखे औदार्य फडणवीस सरकारने दाखवावे. आरक्षणाचा  कार्यक्रम आखून तो जाहीर करावा,'' अशी मागणी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज विधान परिषदेत केली. 

मुख्यमंत्र्यांनी मराठा मोर्चाच्या मागण्यांवर विधान परिषदेत निवेदन केले. त्यानंतर मांडलेल्या राणे यांनी काही मुद्दे मांडले. या आरक्षणाचे श्रेय तुम्ही (फडणवीस) घ्या, पण आरक्षण द्या, अशी मागणी त्यांनी केली. मराठा आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाला मुदतीत अहवाल देण्याचे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्याव राणे यांनी या आरक्षणाचा विषय हा न्यायालयात असला तरी त्यावर ठराविक कार्यक्रम जाहीर केला पाहिजे. तरच मराठा समाजाला सरकारकडून आरक्षण दिले जाणार असल्याची मानसिकता दिसेल. यामुळे मराठा समाजाच्या भावनेचा सरकारने विचार करावा, असेही राणे म्हणाले. 

राज्यात मराठा समाजाचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण त्यांनी राज्यात सर्व घटकांना आरक्षण मिळावे यासाठी सहकार्य केले म्हणूनच राज्यात आज राज्यात 52 टक्के आरक्षण मिळत आहे. आता मराठा समाजातील जे लोक शिक्षण घेऊ शकत नाहीत, त्यांना शिक्षणात, नोकरीत आरक्षण मिळणे आवश्‍यक आहे. त्यामुळे आज आलेला मोर्चा हा शेवटचा ठरावा यासाठी तज्ञांना बोलवा, आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कार्यवाही करा अशी मागणी राणे यांनी केली.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com