Notices to TV Soap Producers by Election Commission | Sarkarnama

प्रचार करणाऱ्या टीव्ही मालिकांच्या निर्मात्यांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा

रामनाथ दवणे
बुधवार, 10 एप्रिल 2019

काही हिंदी तसेच मराठी मालिकांमधून भाजपचा प्रचार होत असल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारी ची गंभीर दखल घेत, त्या मालिकांच्या निर्मात्यांना करणे दाखवा नोटीस निवडणूक आयोगाने बजावली आहे.

मुंबई :  काही हिंदी तसेच मराठी मालिकांमधून भाजपचा प्रचार होत असल्याची तक्रार काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे केली होती. या तक्रारी ची गंभीर दखल घेत, त्या मालिकांच्या निर्मात्यांना करणे दाखवा नोटीस निवडणूक आयोगाने बजावली आहे.

गेल्या काहीं दिवसातल्या मालिकांच्या भागात सरकारच्या योजनांचा हेतू पुरस्सर उल्लेख करण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेसने केली होती. भाजप सरकारने  योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आता टीव्ही मालिकांचा आधार घेतला आहे. या मालिकांमध्ये  'भाभीजी घर पर है,' आणि ‘तुझसे है राबता’ या हिंदी मालिकांचा समावेश असल्याचे नमूद करण्यात आले होते.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी या बाबतची तक्रार केली होती. टीव्ही मालिकांमधून प्रचार करून भाजपने आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून प्रचारासाठी हीन पातळी गाठल्याचा आरोप सावंत यांनी  केला होता. दरम्यान या तक्रारीची निवडणूक आयोगाने अतिशय गंभीर दखल घेतली असून संबंधित निर्मात्यांना नोटीस दिली असल्याची माहिती  अतिरिक्त निवडणूक आयुक्त दिलीप शिंदे यांनी दिली. येत्या २४ तासात या निर्मात्यांनी  नोटीसीला योग्य उत्तर न दिल्यास आचार संहिता भंग च्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असेही शिंदे यांनी सांगितले

संबंधित लेख