notice to bheem suger factory mohol | Sarkarnama

खासदार महाडिकांच्या कारखान्याने केले ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन 

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

मोहोळ (सोलापूर) : भीमा सहकारी साखर कारखान्याने 2017 -18 मधील एफ. आर. पी.प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देणे असलेली 12 कोटी 63 लाख 33 हजार रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशा आशयाची जिल्हाधिकारी यांनी काढलेली नोटीस मोहोळ तहसीलदारांनी आज शुक्रवारी भीमा कारखान्याच्या प्रशासनाला टाकळी सिकंदरचे गाव कामगार तलाठी सिद्धापा कोळी यांच्यामार्फत बजावण्यात आली. 

कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे या कारखान्याचे नेतृत्व आहे. 

भीमा सहकारी कारखान्याने 2017 -18 च्या गळीत हंगामात 4 लाख 11 हजार 876 टन ऊसाचे गाळप केले. शुगर केन कंट्रोल ऑर्डर 1966 मधील तरतुदीनुसार 14 दिवसाच्या आत एफआरपी रक्कम ऊस उत्पादकाला अदा करणे बंधनकारक आहे. त्या रकमेस विलंब झाल्यास त्या कालावधीतील देयकाबाबत न दिलेल्या रकमेवरती व्याज देणे बंधनकारक आहे. त्यानुसार 31 जुलै 2018 अखेरच्या ऊसदेय बाकी अहवालानुसार कारखान्याकडे ऊसाचे निव्वळ 12 कोटी 63 लाख 33 हजार येणे बाकी आहे. कारखान्याने ऊस नियंत्रण 1966 मधील तरतुदीचे उल्लंघन केले आहे. म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी वसुलीकरिता नोटीस काढली होती. सात दिवसाच्या आत सदरची रक्कम न भरल्यास महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियमानुसार सक्तीची कारवाई करण्यात येईल, ही रक्कम मुदतीत न भरल्यास त्यांच्या मिळकतीचा जाहीर लिलाव करून रक्कम वसूल केली जाईल, असे नोटिशीत म्हटले आहे. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख