not propre to talk about maratha arkshan immediately | Sarkarnama

अहवालातील निष्कर्ष कळण्याआधीच मराठा आरक्षणाचा जल्लोष योग्य नाही : कोंढरे

उमेश घोंगडे
गुरुवार, 15 नोव्हेंबर 2018

पुणे : मराठा आराक्षणाचा अहवाल राज्य सरकारला सादर झाला असला तरी त्याचे निष्कर्ष बाहेर आल्याशिवाय अधिक बोलणे योग्य होणार नाही. त्यामुळे आरक्षण कोणत्या प्रकारे देणार, वैधानिक प्रक्रिया काय करणार ? हे राज्य सरकारने स्पष्ट करावे, असे मत मराठा समाजाचे नेते राजेंद्र कोंढरे यांनी आज व्यक्त केले. 

केवळ आरक्षण जाहीर करून चालणार नाही. न्यायालयात ते टिकले पाहिजे त्यासाठी आवश्‍यक असणारी वैधानिक प्रक्रिया सरकारने पूर्ण केली पाहिजे. आलेला अहवाल मंत्रीमंडळाच्या उपसमितीसमोर मांडणार का ? कॅबिनेटच्या मंजुरीनंतर आरक्षण जाहीर करणार की विधी मंडळात मान्य करून घेणार या साऱ्यांचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी द्यायला हवे, अशी मागणी त्यांनी केली.

पुढे कोणतीही घटनात्मक अडचण निर्माण होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. त्यासाठी आरक्षण आणि राज्य घटना यावर काम करीत असलेल्या सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलांचा सल्ला राज्य सरकारने घ्यावा, अशी सूचना कोंढरे यांनी केली आहे. 

मराठा आरक्षणासंदर्भातील मागावसर्ग आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर झाला आहे. या अहवालातील निष्कर्षांच्या आधारे मराठा समाजाला आरक्षण देण्यात येणार आहे. या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता आंदोलन नको, एक डिसेंबरला जल्लोष करा, असे म्हटले आहे. त्यामुळे आरक्षणचा निर्णय एक डिसेंबरपर्यंत जाहीर होईल, असे आडाखे बांधण्यात येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर कोंढरे यांची प्रतिक्रिया महत्वाची आहे. आरक्षणाची भविष्यात अडचण होऊ नये म्हणून सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करा, असा कोंढरे यांचा आग्रह आहे. 
 
संबंधित लेख