non-veg party in presence of dhanjay munde | Sarkarnama

सुरेश धस यांना झणझणीत उत्तर : पुण्यात धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत वशाटोत्सव

उमेश घोंगडे
बुधवार, 1 ऑगस्ट 2018

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फेसबुक पेजवरील फेक अकाऊंट चालवणाऱ्या लोकांकडून दरवर्षी आषाढातील पार्टी होत असते असा आरोप आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेत केला आणि या पार्टीची चर्चा राजकारणात रंगली. ही पार्टी पुण्यात दर वर्षी वशाटोत्सव (वशाट म्हणजे मांसाहार) या नावाने साजरी होते. तिच्या आयोजकांच्या म्हणण्यानुसार आमचा राष्ट्रवादी काॅंग्रेसशी काही संबंध नाही. मात्र धस यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी यंदाचा वशाटोत्सव दणक्यात होणार आहे. 

विधिमंडळाच्या नागपूर येथील पावसाळी अधिवेशनात सोशल मीडियावरील चर्चेत बोलताना फेसबुकच्या फेक अकाऊंटचा संदर्भ देत अशी फेक अकाऊंट चालवणाऱ्यांवर "मोका' कायद्यानुसार कारवाईची मागणी आमदार धस यांनी केली होती. त्यांच्या बोलण्याचा रोख राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फेक अकाऊंटच्या सदर्भाने होता. अशी फेक अकाऊंट चालवणाऱ्यांनी पुण्यात गेल्या वर्षी मोठी पार्टीदेखील केल्याचा आरोप धस यांनी केला होता.

अशी पार्टी आयोजित करणारे  मोहसीन शेख यांनी धस यांचा आरोप फेटाळला. ते म्हणाले, " फेसबुकवर स्वतंत्र असा आमचा कोणताही ग्रूप नाही. सारे फेसबुकवरील मित्र आहेत. सर्वजण एकत्र येऊन दोन वर्षापासून आम्ही "वशाटोत्सव' साजरा करीत असतो. आमच्या या उपक्रमाला कोणताही राजकीय संदर्भ नसतो. मात्र आमदार धस यांनी उगीचच आमचे नाव घेतले आहे. त्यामुळे कोणत्याही राजकीय संबंध किंवा अभिनिवेषाशिवाय यावर्षीदेखील पुण्यात मोठ्याप्रमाणात "वशाटोत्सवा'चे आयोजन करीत आहोत. फेसबुकवरील राज्यभरातील सुमारे एक हजार मित्र यासाठी पाच ऑगस्टला पुण्यात येणार आहेत. कर्वेनगर येथील दुधाने लॉन्स येथे हा उपक्रम पाच ऑगस्टला सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत होणार आहे.'' 

कोणताही राजकीय संदर्भ नसल्याचे सांगण्यात येत असले तरी या "वशाटोत्सवा'च्या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे तसेच पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहीत पवार व ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे उपस्थित राहणार आहेत. 

संबंधित लेख