no water in ministers bunglow | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

मुंबईत मंत्र्यांच्या बंगल्यावर पाणीबाणी 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

मुंबई ः पावसाळा संपला असताना ऑक्‍टोबर महिन्यातच मंत्रालयासमोरील मंत्री, विरोधी पक्षनेते यांच्या बंगल्यातील पाणी पुरवठ्यात मोठी कपात करण्यात आली आहे. त्यामुळे बंगल्यांमध्ये कार्यरत कर्मचारी तसेच येणारे अभ्यागत संतापले असून मागील दहा दिवसांपासून ही परिस्थिती असल्याने विरोधी पक्षनेत्यांनी टिवटरवरून सरकारवर टिकेची झोड उठवली आहे. 

मंत्री तसेच विरोधी पक्षनेते यांच्या बंगल्यांमध्ये विविध कर्मचारी कार्यरत असतात. तसेच त्यांना विविध कामांसाठी भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येत असतात. या बंगल्यांत लोकांची वर्दळ नेहमीच असते. त्या सर्वांचा योग्य पाहुणचार करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर असते. पण पाणीच नसल्यामुळे या सर्वांवर मर्यादा येत आहेत. सर्वांचेच हाल सुरु असून या परिस्थितीमुळे कर्मचारी संतापले आहेत. गेल्या दहा दिवसांपासून कपातीची समस्या निर्माण झाली आहे. 

याविषयी टिवटरवरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर टीका केली आहे. तसेच यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी म्हणाले, आमच्याकडे राज्यातुन सर्वात जास्त लोक येतात. त्यांच्या पिण्याच्या पाण्यापासून ते प्रसाधनगृहासाठी लागणाऱ्या पाण्याचेही हाल होत आहेत. पाणी कपात आहे की नाही याचीही कल्पना दिलेली नाही. 

पाणीकपात, भारनियमन आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या इतर समस्या सामान्य माणसासाठी नव्या नाहीत. औरंगाबाद येथे नुकताच भारनियमनाचा फटका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांना बसला होता. त्यावर सुप्रियाताईंनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता राज्याचा कारभार हाकणाऱ्या मंत्री आणि विरोधी पक्षनेत्याना पाणी टंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. 

संबंधित लेख