No Violence in Agitation at Nashik Tomorrow | Sarkarnama

मराठा आरक्षणासाठी 9 ऑगस्टला नाशिकमध्ये ठिय्या आंदोलन : हिंसा नाही 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत यांसह विविध मागण्यांसाठी उद्या (ता.9) नाशिकला सर्व मराठा संघटनांचे ठिय्या आंदोलन होईल. येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही प्रकारचे हिंसक आंदोलन करायचे नाही. मात्र, प्रत्येक गावातुन ग्रामपंचायतीत ठराव करुन आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठविण्याचा निर्णय आज येथे झाला. 

नाशिक : मराठा समाजाला आरक्षण मिळावे, आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्यावेत यांसह विविध मागण्यांसाठी उद्या (ता.9) नाशिकला सर्व मराठा संघटनांचे ठिय्या आंदोलन होईल. येत्या 30 नोव्हेंबर पर्यंत कोणत्याही प्रकारचे हिंसक आंदोलन करायचे नाही. मात्र, प्रत्येक गावातुन ग्रामपंचायतीत ठराव करुन आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदने पाठविण्याचा निर्णय आज येथे झाला. 

मराठा आरक्षणासाठी आंदोलनासंदर्भात काही संघटनांचे प्रतिनिधी स्वतंत्रपणे आंदोलने करीत होती. या पार्श्‍वभूमीवर दोन गट पडल्याची चर्चा होती. यासंदर्भात आज सकल मराठा समाजाची बैठक सुनिल बागुल यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यात सर्वांनी एकोप्याने काम करण्याचा निर्णय आज झाला. त्यासाठी यापुर्वी जाहीर केल्याप्रमाणे प्रत्येक तहसीलदार कार्यालयासमोर होणारे ठिय्या आंदोलन उच्च न्यायालयाच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणुन स्थगीत करण्यात आले. 

उद्या (ता.9) सकाळी दहा ते सायंकाळी पाच या वेळेत डोंगरे वसतीगृहाच्या मैदानावर शांततापूर्ण ठिय्या आंदोलन होईल. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले जाईल. 30 नोव्हेंबरपर्यंत आरक्षण व आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल. त्याची जबाबदारी राज्य शासनाची असेल असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी सकल मराठा समाजाच्या समितीचे पदाधिकारी बागूल, चंद्रकांत बनकर, अॅड. श्रीधर माने, माजी महापौर प्रकाश मते, हंसराज वडघुले, अर्जुन टिळे, पुजा धुमाळ, संतोष माळोदे, राजू देसले, चेतन शेलार, करण गायकर, गणेश कदम, तुषार जगताप आदींनी विविध सुचना केल्या. 

'राज्यात यापूर्वी अत्यंत शिस्तबध्द व शांततेत 58 मुकमोर्चे काढण्यात आले होते. त्याच शिस्तीने व शांततेत यापुढे आंदोलन होईल. कोणीही हिंसक आंदोलन करु नये. आंदोलनात कोणीही कायद्याचे उल्लंघन करु नये. हिंसा अथवा कायदा, सुव्यवस्थेला गालबोट लागेल असे कृत्य होऊ नये याची दक्षता घ्यावी,' असा ठराव यावेळी करण्यात आला. 

संबंधित लेख