No Relation Between Maratha Kranti Morcha and Valuj Riots | Sarkarnama

वाळूजच्या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नाही : पोलिस आयुक्त

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 14 ऑगस्ट 2018

मराठा समाजाचे आंदोलन सामाजिक होते, ते अशा हिंसक घटनेत सहभागी होतील अशी शक्यता कमीच आहे. तोडफोडीचे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे होते त्याकडे याच दृष्टीने आम्ही बघत आहोत. खात्री करून सीसीटीव्ही तपासून व सखोल तपास करूनच आम्ही आरोपीना अटक करीत आहोत - चिरंजीव प्रसाद

औरंगाबाद : वाळूज येथे नऊ ऑगस्टला औद्योगिक वसाहतीत झालेल्या तोडफोडीशी मराठा आंदोलकांचा संबंध नव्हता, अशा बाबी तपासातून समोर येत असल्याची माहिती पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी (ता. 14) दिली. 

वाळूज येथील आंदोलन आणि कंपन्यात झालेल्या तोडफोडीबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, "मराठा समाजाचे आंदोलन सामाजिक होते, ते अशा हिंसक घटनेत सहभागी होतील अशी शक्यता कमीच आहे. तोडफोडीचे कृत्य गुन्हेगारी स्वरूपाचे होते त्याकडे याच दृष्टीने आम्ही बघत आहोत. खात्री करून सीसीटीव्ही तपासून व सखोल तपास करूनच आम्ही आरोपीना अटक करीत आहोत. मराठा आरक्षणाबाबत नऊ ऑगस्टला औरंगाबादसह राज्यात आंदोलन झाले. शहरात शांतता असताना वाळूजमध्ये कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले. असंख्य कंपन्यांचे यात नुकसान झाले. यानंतर पोलिसांनी धरपकड सुरु केली. आतापर्यंत एकूण 53 जणांना अटक करण्यात आली. त्याची कसून चौकशी सुरु आहे," मराठा क्रांती मोर्चाचा तोडफोडीशी संबंध नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

संबंधित लेख