No permanent Tehsildar in Pankaj Bhujbal's Constituency | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

पुणे : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे दिनांक 21 फेब्रवारी रात्री 8 वाजता धनगर समाजाच्या शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांना भेटणार.'

पंकज भुजबळांच्या मतदारसंघात तीन वर्षे मिळेना तहसीलदार

  संजीव निकम 
शनिवार, 18 ऑगस्ट 2018

प्रलंबीत प्रश्‍नांची टांगती तलवार सतत नांदगाव तालुक्‍यावर आहे. दुसरीकडे प्रशासकीय पातळीवरील उपाययोजना करणारी यंत्रणा मात्र सतत प्रभारी आहे. जनतेच्या कामासाठी कुणालाही फारसे सोयरसुतक नसल्याची तक्रार सतत विरोधकाकंडून होत आहे. त्यामुळे सध्या महसुल विभागाने नांदगावला प्रयोगशाळेचे स्वरुप दिल्याचे चित्र आहे.

नांदगाव : टंचाई आणि अडचणींना सामोरे जात असलेला नांदगाव मतदारसंघ वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. तालुक्‍यात कोट्यावधींच्या योजना मंजुर आहेत. मात्र, शासकीय कार्यालयांतुन नागरिकांना प्रतिसाद नाही. शासकीय कार्यालयांपेक्षा आमदार पंकज भुजबळ यांचे कार्यालय सतत धावते आहे. मात्र, गेल्या तीन वर्षात इथे कायमस्वरुपी तहसीलदारच मिळालेला नाही. 

प्रलंबीत प्रश्‍नांची टांगती तलवार सतत नांदगाव तालुक्‍यावर आहे. दुसरीकडे प्रशासकीय पातळीवरील उपाययोजना करणारी यंत्रणा मात्र सतत प्रभारी आहे. जनतेच्या कामासाठी कुणालाही फारसे सोयरसुतक नसल्याची तक्रार सतत विरोधकाकंडून होत आहे. त्यामुळे सध्या महसुल विभागाने नांदगावला प्रयोगशाळेचे स्वरुप दिल्याचे चित्र आहे. तालुक्‍याचा कारभार हाकणारे प्रशासक असलेल्या तहसीलदारांचे पद रिक्तच आहे. गेले तीन वर्षे ही स्थिती असल्याने नागरिकांच्या समस्या सुटण्याएैवजी रेंगाळल्याचे चित्र आहे. 

आमदार पंकज भुजबळ विविध प्रश्‍न, योजनांचा पाठपुरावा करीत आले आहेत. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत तालुक्‍यातील प्रशासकीय स्थैर्य गमावल्याची तक्रार जिल्हा परिषद सदस्या अश्विनी आहेर यांनी तक्रार केली होती. येवला आणि नांदगाव मतदारसंघ म्हणजे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळांचे बालेकिल्ले संबोधले जातात. यामध्ये येवल्याच्या कामांना गती आहे. त्यात नांदगाव कमी का पडते? ही खंत आहे. नांदगावलाही गतीमान होण्याची प्रतिक्षा आहे. 

आमदार पंकज भुजबळ यांनी तहसीलदारांच्या नियुक्तीसाठी सतत पाठपुरावा व पत्रव्यवहार केला आहे. निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर या नियुक्‍त्या आयोगाच्या कक्षेत आहेत. त्यामुळे विलंब होत आहे. लवकरच कायमस्वरुपी तहसीलदार मिळेल - विनोद शेलार, स्वीय सहाय्यक 

संबंधित लेख