no one oppose udyanraje for satara seat : Pawar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत 45 % मतदान
सातारा सातारा लोकसभा मतदारसंघ ३ वाजेपर्यंत ४३ .१४ टक्के मतदान
औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत 45 टक्के मतदान
रावेर लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 38.12% मतदान
जळगाव लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत 37.24% मतदान
रायगड मध्ये तीन वाजेपर्यंत 38.46 टक्के मतदान
बारामतीत ३ वाजेपर्यंत ४१.७५ टक्के मतदान
पुण्यात ३ वाजेपर्यंत ३३.०४ टक्के मतदान
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात 3 वाजेपर्यंत झालेले मतदान 45.10 टक्के

उदयनराजे यांच्या उमेदवारीला कोणाचाही विरोध नाही : शरद पवार

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

पुणे ः राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार उदयनराजे यांच्या उमेदवारीला साताऱ्यातील पक्षाच्या आमदारांचा विरोध नसल्याचे स्पष्टीकरण पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. या आमदारांनी माझी भेट घेतल्यानंतर ज्या बातम्या आल्या, त्याचे मला आश्चर्य वाटले, असेही पवार यांनी सांगितले.

उदयनराजे यांच्या उमेदवारीचा विषय गेले तीन दिवस गाजतो आहे. साताऱ्यातील आमदारांनी काल पवार यांची बारामती येथे भेट घेतली होती. त्यानंतर उदयनराजे यांनीही पवार यांची पुण्यात भेट घेतली. त्यावर विविध तर्क मांडण्यात आले.

याबाबत पुण्यात बोलताना पवार म्हणाले की उदयनराजे यांच्या उमेदवारीला एकाही आमदाराने विरोध केलेला नाही. सर्वजण मिळून पुढील आठ दिवसांत यावर निर्णय घेऊ. त्यासाठी सर्व आमदार, जिल्हाध्यक्ष यांच्यासह लोकसभेच्या इच्छुक उमेदवारांच्या खेळीमेळीच्या वातावरणात या बैठका घेऊ आणि निर्णय करू असेही त्यांनी नमूद केले.

खुद्द पवार यांनीच ही बाब स्पष्ट केल्याने उदयनराजे यांच्या समर्थकांना साहजिकच दिलासा मिळणार आहे. उदयनराजे यांनी साताऱ्यात पवार यांची भेट घेतल्यानंतर फसवाफसवी करू नका, नाहीतर मलाही कळतं, अशी प्रतिक्रिया दिली होती. पवार यांनी मात्र उदयनराजे आपल्य़ाशी असे बोलले नसल्याचे सांगितले होते. आता पवार यांच्या ताज्या वक्तव्यानंतर सातारा राष्ट्रवादीतील मतभेदांवर तोडगा निघण्याची शक्यता आहे.  

संबंधित लेख