खेड राष्ट्रवादीला मतभेदांनी ग्रासले..जिल्हा कार्यकारिणीत एकालाही स्थान नाही...

खेड राष्ट्रवादीला मतभेदांनी ग्रासले..जिल्हा कार्यकारिणीत एकालाही स्थान नाही...

राजगुरूनगर : पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर झाली असून खेड तालुक्यातील एकही पदाधिकारी नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. खेड तालुक्यातील पक्षातील मतभेदांमुळे या यादीत तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नावे आली नसल्याची चर्चा आहे.

जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात जवळपास 100 पदाधिकारी जाहीर करण्यात आले. कार्यकारिणीत विशेष निमंत्रित म्हणून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि रामभाऊ कांडगे, ही दोन नावे वगळता उर्वरित यादीत एकही नाव खेडमधील नसल्याने चर्चा होऊ लागली. यादीत मोहिते पाटील यांच्या विरोधातील काही नावे होती. म्हणून काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीत त्यांनी जाहीरपणे हरकत घेतली होती. त्यामुळे खेड तालुक्याची यादी प्रलंबित ठेवल्याची चर्चा आहे.

याबाबत तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर म्हणाले, जे पक्षाचे निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करतात त्यांना संधी मिळावी असा आमचा पक्षाकडे आग्रह आहे. निवडणुकांमध्ये, पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये व आंदोलनामध्ये काम करणाऱ्यांना पदांचा लाभ मिळाला पाहिजे. अनेकजण पक्षाला गरज असताना पक्षाच्या विरोधात भूमिका घेतात. विरोधकांना फायदा होईल, असे वागतात आणि फक्त पद आणि तिकीट मागायची वेळ आल्यावर पुढे येतात, अशांचा समावेश नको, असे आमचे म्हणणे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार माजी जिल्हा परिषद सदस्य अनिलबाबा राक्षे यांना जिल्हा उपाध्यक्ष पद देण्यात येणार होते, त्याला मोहिते पाटील आणि समर्थकांचा विरोध आहे. राक्षे राष्ट्रवादीकडून विधानसभेच्या तिकिटासाठी स्पर्धक असल्याने मोहिते समर्थकांना ते नको आहेत. याच भूमिकेतून जिल्हा परिषदेलाही राक्षे यांचे तिकीट कापण्यात आले होते. शैलेश मोहिते यांनी दिलीप मोहिते यांची साथ सोडल्यावर ते राक्षेंबरोबर असतात म्ह्णूनही त्यांना त्यांचा राग आहे. राक्षे वगळता तालुका राष्ट्रवादीत मोहिते पाटलांना फारसा विरोध राहिलेला नाही. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर, मोहिते समर्थकांना खेड तालुका पक्षावर एकछत्री अंमल हवा आहे. त्यासाठीच त्यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न केला आहे.

पक्षात मतभेद वगैरे काही नाहीत. खेडमधील नावांबाबत चर्चा सुरु आहे. दुसऱ्या यादीत खेडमधील पदाधिकाऱ्यांची नावे येतील. चारदोन दिवसांतच यादी प्रसिद्ध होईल, असे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी सांगितले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com