no one comes to support mla medha kulkarni | Sarkarnama

आमदार मेधा कुलकर्णी रडल्या पण भाजपमधील कोणीच मदतीला नाही आले!

उमेश घोंगडे
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

पुणे : मराठा आंदोलनाच्या संदर्भाने आमदार मेधा कुलकर्णी यांच्या निवसस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलकांच्या भावना तीव्र होत्या. आंदोलकांनी त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. आमदार कुलकर्णी स्वत: दिवसभर तणावात होत्या. मात्र दिवसभरात पक्षाचे शहाराध्यक्ष किंवा पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी साधी विचारपूसदेखील केली नाही. 

पुणे : मराठा आंदोलनाच्या संदर्भाने आमदार मेधा कुलकर्णी यांच्या निवसस्थानासमोर मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. या दरम्यान आंदोलकांच्या भावना तीव्र होत्या. आंदोलकांनी त्यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला. आमदार कुलकर्णी स्वत: दिवसभर तणावात होत्या. मात्र दिवसभरात पक्षाचे शहाराध्यक्ष किंवा पक्षातील इतर पदाधिकाऱ्यांनी साधी विचारपूसदेखील केली नाही. 

कोथरूडच्या आमदार, मराठी भाषा समितीच्या अध्यक्षा म्हणून कुलकर्णी यांची ओळख आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्यावर्षी काढण्यात आलेल्या मूक मोर्चात आपण सहभागी झालो होतो. मात्र सध्या सुरू असलेल्या आंदोलनासंदर्भात गुरूवारी आपण जे काही बोललो त्याचा विपर्यास करून माझ्या विरोधात वातावरण तापाविण्याचा प्रयत्न होत असल्याची भावना आमदार कुलकर्णी यांनी मांडली.

दुसरीकडे आमदार कुलकर्णी यांच्या वक्तव्याने आंदोलक कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र झाल्या होत्या. कुलकर्णी यांच्या मुलाने आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत आंदोलकांनी घरासमोर जोरदार आंदोलन केले. आंदोलकांनी महिला म्हणून कुलकर्णी यांच्याविषयी आदर असल्याचे सांगितले. पण त्यांनी भावना भडकविणरे वक्तव्य करायला नको होते. तसेच त्यांनी आमचे निवेदन स्वीकारण्यासाठी यायला हवे होते, अशी भावना व्यक्त केली.

या साऱ्या घडामोडीत पक्षाकडून किंवा पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांच्याकडून विचारपूरस करणारा किंवा परिस्थितीची माहिती घेण्यासाठी साधा फोनदेखील कुलकर्णी यांनी आला नाही. पालकमंत्री गिरीश बापट यांनी त्यांना सकाळी फोन केला. मात्र निवेदन स्वीकारण्यासाठी आंदोलक आंदोलन करीत असलेल्या ठिकाणी जावे, असे बापट यांनी त्यांना सांगितले. मात्र तिथली परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने तिथे जाणे योग्य नसल्याचा सल्ला पोलिस आधिकाऱ्यांनी दिला होता, असे कुलकर्णी यांनी सांगितले. त्यामुळे मी घरासमोर निवेदन स्वीकारण्यासाठी गेले नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले. हा सारा घटनाक्रम सांगत असताना त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. दुसरीकडे भाजपमधील कोणीच पाठिंबा देण्यासाठी का आले नाही, याचीही खंत त्यांना होती. 

आमदार कुलकर्णी यांची कामाची शैली पक्षातील काहीजणांना रूचत नाही. पक्षातील अनेकजण त्यांच्याशी फटकून वागतात. त्यांचे कधी काळचे समर्थक असलेलेही आज त्यांच्यासोबत नाहीत. त्यांच्याच मतदारसंघातील भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांनीही मेधा कुलकर्णी यांच्या कथित वक्तव्याचा निषेध केला. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख