गुजरातमध्ये भाजपला कुणीच हरवू शकत नाही-रावसाहेब दानवे

औरंगाबाद : "गुजरातची जनता ही अस्मिता जपणारी आहे, शिवाय भाजपने या राज्यात चौफेर विकास केलेला आहे. विकासाच्या मुद्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा गुजरातच्या जनतेला कौल मागत आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये विजय आमचाच होणार आहे, इथे भाजपला कुणीच हरवू शकत नाही," असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी 'सरकारनामा'च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
गुजरातमध्ये भाजपला कुणीच हरवू शकत नाही-रावसाहेब दानवे

औरंगाबाद : "गुजरातची जनता ही अस्मिता जपणारी आहे, शिवाय भाजपने या राज्यात चौफेर विकास केलेला आहे. विकासाच्या मुद्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे अध्यक्ष अमित शहा गुजरातच्या जनतेला कौल मागत आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये विजय आमचाच होणार आहे, इथे भाजपला कुणीच हरवू शकत नाही," असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी 'सरकारनामा'च्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.

गेल्या विधानसभा निवडणुकीपेक्षा यावेळी गुजरातमध्ये मतदानाचा टक्का घसरला, काँग्रेसने प्रचारात आघाडी घेत भाजपला दिलेले आव्हान, शिवसेनेने मैदानात उतरवलेले उमेदवार या सगळ्या गोष्टीचा निवडणूक निकालावर काय परिणाम होतील, या विषयावर रावसाहेब दानवे यांनी आपली मते मांडले.

ते म्हणाले, "गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्यात मतदान काही प्रमाणात घटले हे जरी खरे असले तरी त्याचा निकालावर काही परिणाम होणार नाही. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे देशातील दोन मोठे नेते गुजरातचे आहेत, आणि तेच निवडणुकीचे नेतृत्व देखील करत आहेत. काँग्रेसने प्रचारात आघाडी घेतली म्हणण्यापेक्षा त्यांनी जाती-पातीचा आधार घेत मोदी यांच्या बद्दल अपशब्द वापरले आहेत."

गुजरातमध्ये भाजप सरकारच्या काळात प्रचंड विकास झालेला आहेच, त्यामुळे मतदार विकासाच्या बाजूने कौल देतील यात शंका नाहीच. गुजरातची जनता अस्मिता जपणारी असल्याने त्याच्याशी तडजोड करणार नाही आणि भाजप बहुमताने पुन्हा सत्तेवर येईल असा विश्‍वास रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केला.

शिवसेनेला उमेदवार देण्याचा अधिकार
"भाजपला रोखण्यासाठी शिवसेना टोकाचा विरोध आणि टीका करणार, त्यांना ती करू द्या आम्हाला काही फरक पडत नाही. काँग्रेसचे नेते राहूल गांधी आज त्यांना प्रभावी वाटत आहेत त्याबद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही. आमचा आणि त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे. केवळ गुजरातच नाही तर यापुर्वी झालेल्या उत्तर प्रदेश, राजस्थान राज्यातील निवडणुकांमध्ये देखील शिवसेनेने उमेदवार दिले होते. तसे गुजरातमध्येही दिलेले आहेत. त्यांना आपला पक्ष वाढवण्याचा पुर्ण अधिकार आहे,'' असे दानवे म्हणाले.

आम्हालाच अदृश्‍य 'हाता' ची मदत
नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या अदृश्‍य हातांची आम्हाला मदत होईल असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केला होता. याविषयी विचारले असता, काँग्रेसला शिवसेनेच्या अदृश्‍य हातांची मदत झाली नाही, पण काँग्रेसच्या अदृश्‍य हातामुळे मात्र आम्हाला 9 मते अधिक मिळाल्याचा टोला रावसाहेब दानवे यांनी लगावला.

नाराजी शेतकऱ्यांमध्ये नाही तर विरोधकांमध्ये
शेतकरी कर्जमाफी, बोंडआळीमुळे कापूस उत्पादकांचे झालेले प्रचंड नुकसान आणि सोयाबीन, कापूस खरेदीची ऑनलाईन प्रक्रिया यामुळे शेतकरी सरकारवर प्रचंड नाराज आहेत? नागपूरच्या विधीमंडळ अधिवेशनावर शरद पवारांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे? या प्रश्‍नांवर "शेतकऱ्यांमध्ये नाही तर विरोधकांमध्ये नाराजी आहे," असे दानवे म्हणाले. कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी उशीर होत असला तरी त्यामागे खऱ्या शेतकऱ्याला मदत व्हावी हा सरकारचा हेतू आहे. बोंडआळीने नुकसान झालेल्या कापूस उत्पादकांचे पंचनामे आणि त्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत, असेही दानवे यांनी सांगितले.

शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणाऱ्या हल्लाबोल मोर्चा ही त्यांची राजकीय भूमिका आहे. लोकांनी त्यांना विरोधात बसवले आहे, त्यामुळे सरकारवर टीका करणे, त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरणे यात काही वावगे नाही, असे सांगत दानवे यांनी विरोधकांच्या हल्लाबोल मोर्चावर प्रतिक्रिया दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com