...अन्‌ पी. चिदंबरम यांच्या आवाहनावर एकही हात उंचावला नाही!

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे 'भारतीय अर्थव्यवस्था : अल्प गुंतवणूक, अल्प रोजगार' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर, निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व्यासपीठावर होते. व्याख्यानासाठी सर्व क्षेत्रातील मोठी गर्दी होती.
...अन्‌ पी. चिदंबरम यांच्या आवाहनावर एकही हात उंचावला नाही!

 नाशिक : "तुम्ही उद्योजक, व्यावसायिक आहात. गेल्या वर्षभरात वाढीव रोजगार निर्माण झाला असेल त्याने हात वर करा'' असे आवाहन माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी यंत्रभूमी, मंत्रभूमी नाशिकमध्ये केले. उद्योग, व्यावसायिक, विविध क्षेत्रातील उपस्थितीने गच्च सभागृहात बराच वेळ प्रतिक्षा केल्यावरही एकही हात उंचावला नाही. त्यावर पंतप्रधानांनी निर्माण केलेले सत्तर लाख रोजगार गेले कुठे? असा प्रश्‍न त्यांनी केला. 

महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस समितीतर्फे 'भारतीय अर्थव्यवस्था : अल्प गुंतवणूक, अल्प रोजगार' या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर, निवृत्त न्यायमूर्ती अभय ठिपसे, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण व्यासपीठावर होते. व्याख्यानासाठी सर्व क्षेत्रातील मोठी गर्दी होती. यावेळी चिदंबरम म्हणाले, ''देशाची अर्थव्यवस्था भांडवली गुंतवणूक, निर्यात, नागरीकांची क्रयशक्ती आणि सरकारी खर्च यावर चालते. देशातील भांडवली गुंतवणूकीचे प्रमाण सहा सात वर्षांपूर्वी 35 टक्के होते. सध्या ते 28 टक्के आहे. बॅंकांनी कर्जवितरण बंद केले आहे. काँग्रेस सत्तेत असतांना निर्यात 314 अब्ज रुपये होती. ती सध्या 303 अब्ज एव्हढी घसरली आहे.''

ते पुढे म्हणाले, "नागरिकांची क्रयशक्ती संपुष्टात आली आहे. काल राजस्थानला पंतप्रधानांच्या सभेवर सरकारने 7.22 कोटी रुपये खर्च केले. एकंदर सरकारी खर्च वगळता काहीही वाढत नाही. त्यामुळे अर्थव्यवस्थेची तीन चाके पंक्‍चर आहेत. या पंक्‍चर चाकांवर सध्या देशाच्या अर्थव्यवस्थेची गाडी चालली आहे. त्यामुळे आजची स्थिती अत्यंत दयनीय बनली आहे. तुमच्या मुलांचे, नातवांचे भवितव्य कुठला राजकीय पक्ष, एक दोन नेते नव्हे तर तुमच्या हाती आहे." उद्याची देशाची स्थिती काय हवी हे मतदानातुन ठरवण्याची संधी तुम्हाला आहे, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे नाव न घेता 'त्यांना' पराभूत करुन ती सुधारेल असे चिदंबरम यांनी सूचीत केले.

चिदंबरम पुढे म्हणाले, "नोटबंदी हा अतिशय चुकीचा निर्णय होता. त्याचा उद्देश काय होता व साध्य काय झाले हे अद्याप सरकारला सांगता आलेले नाही. किती पैसे जमा झाले हे रिझर्व्ह बॅंक सांगु शकलेली नाही. एव्हढे दिवस झाले तरी ते सतत मोजणी सुरु आहे असे सांगतात." तिरुपती देवस्थानच्या हुंडीत जमा होणारे पैसे दुसऱ्या दिवशी मोजले जातात. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेलाही तिरुपतीला पाठवायला पाहिजे अशी टोमणा त्यांनी मारला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com