मोदी-शहा सोडून कोणालाही पंतप्रधान बनवा भाजपला पाठिंबा देतो : अरविंद केजरीवाल 

मोदी-शहा सोडून कोणालाही पंतप्रधान बनवा भाजपला पाठिंबा देतो : अरविंद केजरीवाल 

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी आणि अमित शहा सोडून जर या पक्षातील कोणताही नेता पंतप्रधान बनल्यास भाजपला "आप'ला पाठिंबा असेल असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. 

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर केजरीवाल यांनी मोदी-शहा जोडगोळीवर पुन्हा एकदा टीका केली आहे. निवडणुकीला सामारे जाताना भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार जर या दोघांना वगळून अन्य कोणत्याही नेत्याचे पुढे केले तर आप भाजपला पाठिंबा देईल असेल त्यांनी प्रथमच जाहीर केले आहे. 

केजरीवाल म्हणाले, "" 2019 ची निवडणूक या मुद्यावर व्हायला हवी. मोदी-शहा जोडीला प्रथम हटविले पाहिजे. हे दोघे सोडून देशाचा पंतप्रधान कोणीही चालू शकतो. मग ती व्यक्ति कोण याला काही महत्त्व नाही. दिल्ली वक्‍फ बोर्डाच्या कार्यक्रमात केजरीवाल बोलत होते. 

एकीकडे भाजपवर टीका करताना दुसरीकडे त्यांनी कॉंग्रेसवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले,की कॉंग्रेसला मत देणे म्हणजे भाजपला विजयी करणे आहे. आगामी निवडणुकीत दिल्लीतील सातही जागेवर आपचे उमेदवार विजयी होती असा दावाही त्यांनी केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com