No lawyer , No police protection ,Chindam's stay in Jail extended | Sarkarnama

श्रीपाद छिंदमला मिळेना वकील ,कारागृहातील  मुक्काम वाढला !

संपत देवगिरे :  सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 1 मार्च 2018

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेला श्रीपाद छिंदम आज अक्षरशः एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले. चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आज संपत असल्याने त्याला नगरच्या न्यायालयात हजर केले जाणार होते. मात्र पोलिसांनी बंदोबस्त दिला नाही. कोणीही वकील त्याची बाजु मांडण्यास तयार झाला नाही. त्यामुळे तो कारागृहातच अडकून  पडला.

नाशिक  :  छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलेला श्रीपाद छिंदम आज अक्षरशः एकाकी पडल्याचे स्पष्ट झाले. चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी आज संपत असल्याने त्याला नगरच्या न्यायालयात हजर केले जाणार होते. मात्र पोलिसांनी बंदोबस्त दिला नाही. कोणीही वकील त्याची बाजु मांडण्यास तयार झाला नाही. त्यामुळे तो कारागृहातच अडकून  पडला.

नगर महापालिकेचे पदच्युत  उपमहापौर श्रीपाद छिंदम यांने महापालिका कर्मचाऱ्याशी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरुन तीव्र प्रतिक्रीया उमटल्याने पोलिसांनी त्याला अटक केली. त्याला न्यायालयाने चौदा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. नगरच्या कारागृहात कैद्यांनी मारहाण  केल्याने त्याला बंदोबस्तात नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात हलविले होते. आज त्याची कोठडी संपत असल्याने नगरच्या न्यायालयात हजर केले जाणार होते.

  पुरेसा बंदोबस्त उपलब्ध झालेला नाही आणि छिंदम संवेदनशील कैदी असल्याने पोलिसांनी त्याला नेण्यास असमर्थता दर्शविली असे समजते . नगर बार असोसिएशनने त्याची वकीलपत्र घेणार नसल्याचा ठराव केला आहे. त्यामुळे कोणीही वकील त्याची बाजु मांडण्यास तयार नव्हता. यामध्ये छिंदम एकाकी पडला. आता त्याने जिल्हा न्याय सहाय्यक समितीकडे सरकारी वकील मिळावा असा अर्ज केला आहे. त्यावर काय निर्णय होतो याची प्रतिक्षा आहे. यामध्ये छिंदम कारागृहातच अडकून  पडला. त्याला कारागृहाच्या वरिष्ठ सुत्रांनी दुजोरा दिला.

संबंधित लेख