no invitation to MP adhalrao for CM`s function | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात खासदार आढळराव बेदखल; मात्र महेश लांडगें व्यासपीठावर

हरिदास कड
मंगळवार, 20 नोव्हेंबर 2018

चाकण : येथील औद्योगिक वसाहतीतील सावरदरी (ता.खेड) गावच्या हद्दीतील फिलीप्स इंडिया लि. या कंपनीच्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १६ नोव्हेंबर रोजी आले होते. या कार्यक्रमासाठी स्थानिक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सुरेश गोरे यांना मात्र कंपनीच्या वतीने निमंत्रण देण्यात न आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

कंपनीचा खासगी कार्यक्रम म्हणून स्थानिक पदाधिकाऱ्यांना मज्जाव होता. मात्र भोसरीचे आमदार महेश लांडगे, मावळचे आमदार बाळा भेगडे उपस्थित राहील्याने आढळराव यांनी कंपनीच्या या नियोजनाबद्दल नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की मी उद्योजक आहे. मराठा चेंबर आॅफ काॅमर्सचा पदाधिकारी आहे. मला उद्योजक म्हणून तरी बोलावणे आवश्यक होते. दुसऱ्या तालुक्यातील आमदार कार्यक्रमाला हजर असताना स्थानिक आमदारांना बोलवले जात नाही, हे चुकीचे आहे.

फिलिप्स कंपनीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत आमदार लांडगे व भेगडे हजर होते. या कार्यक्रमात भाजपच्या पदाधिकाऱ्यांना स्थान दिले . मात्र शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना स्थान दिले नाही अशी खंत खासदारांनी व्यक्त केली.

कंपनीच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री कार्यालयाने कोणाला बोलावयाचे याचे नियोजन केले होते त्यामुळे आम्हाला काही माहीती नाही, असा त्यांनी यावर खुलासा केला. 

कंपन्यांना स्थानिक अडचणी अनेक येतात त्या सोडविण्यासाठी स्थानिक खासदार, आमदार पुढे असतात. त्यामुळे स्थानिक प्रतिनिधींना बोलावणे गरजेचे होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणात माय फ्रेंड महेश लांडगे, लोकल एमएलए असा उल्लेख केला. शिरूर तालुक्यातही एका कंपनीच्या कार्यक्रमात मला बोलावण्यात आले नव्हते, असे खासदार आढळराव यांनी सांगितले. 
 
संबंधित लेख