no full time power for farmer | Sarkarnama

"शेतकऱ्यांसाठी पूर्णवेळ  वीजपुरवठा अशक्‍य' 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 14 नोव्हेंबर 2018

जळगाव: ""कृषी ग्राहकांना आज चक्राकार पद्धतीने रात्री आठ ते दहा तास वीजपुरवठा देत आहोत. शेतकऱ्यांना पूर्णवेळ वीजपुरवठा देणे अशक्‍य आहे. पूर्णवेळ वीज दिल्यास पाणी वाया जाईल आणि जमिनीतील पाण्याची क्षमतादेखील कमी होण्याची भीती आहे,'' असे भाजपचे राज्य प्रवक्‍ते तथा महावितरण कंपनीचे संचालक विश्‍वास पाठक यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. 

"महावितरण'च्या वतीने गेल्या चार वर्षांतील कामाचा लेखाजोखा असलेल्या "प्रगतीची 4 वर्षे' या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन अल्पबचत भवन येथे करण्यात आले. या वेळी संवाद साधताना पाठक म्हणाले की, विजेची निर्मिती झाल्यानंतर ती साठविता येत नाही. निर्मिती झाल्यानंतर लागलीच तिचे वितरण करावे लागते. गेल्या चार वर्षांपूर्वी 17 ते 18 मेगावॉट इतकी असलेली विजेची मागणी 25 हजार मेगावॉटपर्यंत पोचली आहे. तरीदेखील "महावितरण'कडून विक्रमी वीजपुरवठा केला आहे. 
आज संपूर्ण राज्य भारनियमनमुक्‍त झाले असून, कोळशाच्या तुटवड्यामुळे आपत्कालीन भारनियमन करावे लागते. ते थांबविण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांकडे कोळसा उपलब्ध करण्यासाठी मागणी केली असून, त्याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे. 

संबंधित लेख