माजी सैनिकांबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्या आमदार परिचारकांचे निलंबन कायमच

भाजपचे विधान परिषदेतील आमदार प्रशांत परिचारक यांना सभागृहात येण्यासाठी असलेलीनो एंट्री कायम ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. मात्र त्यावरून मोठा गोंधळ सभागृहात झाला.
माजी सैनिकांबद्दल वादग्रस्त बोलणाऱ्या आमदार परिचारकांचे निलंबन कायमच

मुंबई : सैनिकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणरे विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांना विधान परिषद सभागृहात प्रवेश बंदीचा आदेश कायम राहणार असल्याचे आज स्पष्ट झाले.

विधान परिषदेचे कामकाज संपत असताना अचानक सभापतींनी प्रशांत परिचारक यांच्याबाबत प्रस्ताव आणला. त्यावरून शिवसेना नेते दिवाकर रावते आणि सभापती यांच्यात वाद झाला. परिचारक यांचे निलंबन फेब्रुवारी 2018 मध्येच मागे घेण्यात आले आहे. तरीही सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना सभागृहात प्रवेशबंदी आहे. ही बंदी सभापती मागे घेत असल्याच्या समजातून परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. 

अनिल परब यांचा परिचारक यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव सद्यस्थितीत राखून ठेवला असून त्याच्या बडतर्फीच्या सूचना स्वीकारार्ह नाही, असे मत सभापतींनी मांडले. परंतु त्यांना सभागृहात येऊ देण्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

त्यावरून सभागृहात अचानक गदारोळ झाला. अनिल परब यांनी दिलेला प्रस्ताव सभापतींनी फेटाळला अशी भावना झाल्याने गदारोळ झाला. देश आणि सैनिकबद्दल भावना तीव्र असताना अचानक हा प्रस्ताव आला त्यामुळे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना नेते खवळले. अखेरीस असा कोणताही निर्णय झाला नसून गटनेत्यांच्या बैठकीत प्रशांत परिचारक यांच्याबाबत निर्णय होईल हे मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकित स्पष्ट झाले.

सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी याबाबत अधिक स्पष्टीकरण दिले. परिचारक यांना बडतर्फ करावा असं अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला होता. मात्र परिचारक यांना सभागृहात येण्याची परवानगी अजून दिलेली नाही

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com