No Confidence Against Parnet Market Committee Chairman Droped | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

विनोद तावडे कृष्णकुंजवर . राज ठाकरे आणि विनोद तावडे यांच्यात चर्चा .

पारनेर बाजार समिती सभापतींच्या विरोधातील अविश्वास ठराव अखेर बारगळला

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 1 ऑक्टोबर 2018

आज बाजार समितीत सहाय्यक निबंधक सुखदेव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन केले होते. सुजित झावरे व गायकवाड यांच्या गटात मागील तीन-चार दिवसांपासून संचालकांची पळवापळवी होत होती. त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बैठकीच्या वेळेत गायकवाड यांच्यासह केवळ अधिकारी उपस्थित होते. पंधरा मिनिटे वाट पाहूनही कोणीही संचालक उपस्थित न राहिल्यामुळे सूर्य़वंशी यांनी इतिरवृत्तात तशी नोंद करून ठराव बारगळल्याचे जाहीर केले

नगर : पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड यांच्यावरील अविश्वास ठरावावर चर्चा करण्यासाठी आज बोलाविण्यात आलेल्या बैठकीला केवळ प्रशांत गायकवाड हेच उपस्थित होते. इतर सर्व संचालक गैरहजर राहिल्याने हा ठराव बारगला. 

आज बाजार समितीत सहाय्यक निबंधक सुखदेव सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे नियोजन केले होते. सुजित झावरे व गायकवाड यांच्या गटात मागील तीन-चार दिवसांपासून संचालकांची पळवापळवी होत होती. त्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बैठकीच्या वेळेत गायकवाड यांच्यासह केवळ अधिकारी उपस्थित होते. पंधरा मिनिटे वाट पाहूनही कोणीही संचालक उपस्थित न राहिल्यामुळे सूर्य़वंशी यांनी इतिरवृत्तात तशी नोंद करून ठराव बारगळल्याचे जाहीर केले. तसेच ही बैठक समाप्त झाल्याचे सांगितले.

झावरे व आमदार औटी यांची नाचक्की
गेल्या पंधरा दिवसांपासून या प्रकरणी पारनेर तालुक्यातील वातावरण ढवळून निघाले होते. गायकवाड यांनी सभापतीपदाचा राजीनामा द्यावा, यासाठी राष्ट्रवादीचे नेते सुजित झावरे यांनी प्रयत्न केले. परंतु, राजीनामा देण्यास गायकवाड तयार झाले नसल्याने अखेर शिवसेनेच्या तीन संचालकांना सोबत घेवून झावरे यांनी बाजार समितीत अविश्वासाचा ठराव दाखल केला होता. त्यानंतर शिवसेनेशी हातमिळवणी केली म्हणून राष्ट्रवादीच्या वरिष्ठांकडून झावरे यांना मेमोही मिळाला. आता हा ठराव बारगळल्याने शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्यासह झावरे यांची मोठी नाचक्की झाली. विरोधी संचालक फोडण्याऐवजी त्यांचेच संचालक गैरहजर राहिल्याने हे दोघांचेही मोठे अपयश मानले जाते.

संबंधित लेख