no changes in pune`s office bearers : BHimale | Sarkarnama

पिंपरीचे धोरण पुण्यात नाही; पदाधिकारी बदलणार नाहीत : भिमाले

ज्ञानेश सावंत
मंगळवार, 24 जुलै 2018

पुणे : भाजपची सत्ता असलेल्या महापालिकांमधील कारभाराची घडी नीटनेटकी बसविण्याच्या उद्देशाने पक्ष नेतृत्वाने महापौर आणि उपमहापौर बदलण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, पुणे शहराबाबत भाजपचे धोरण निराळे असल्याचे सांगून एकही पदाधिकारी बदलण्याचा नेतृत्त्वाचा विचार नाही, असे महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

पुणे : भाजपची सत्ता असलेल्या महापालिकांमधील कारभाराची घडी नीटनेटकी बसविण्याच्या उद्देशाने पक्ष नेतृत्वाने महापौर आणि उपमहापौर बदलण्यास प्रारंभ केला आहे. मात्र, पुणे शहराबाबत भाजपचे धोरण निराळे असल्याचे सांगून एकही पदाधिकारी बदलण्याचा नेतृत्त्वाचा विचार नाही, असे महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सांगितले.

पुणे महापालिकेतील सर्व पदाधिकारी अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. पक्षाची भूमिका स्पष्ट करून भिमाले यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिलासा दिल्याने महापौर-उपमहापौर बदलाची शक्‍यता नसल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, फेरबदल निश्चित असल्याची शक्यता काही भाजप नेत्यांनी वर्तविली. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे महापौर आणि उपमहापौरांनी मंगळवारी राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुणे महापालिकेतील पदाधिकारी बदलाबाबत उत्सुकता निर्माण झाली. परंतु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याशी झालेल्या चर्चेचा तपशील मांडून भिमाले दोन्ही पदे बदलण्याची शक्‍यता पूर्णपणे फेटाळून लावली. 

आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जाताना महापालिकांमधील पक्षाची कामगिरी सुधाण्यावर भाजप नेतृत्वाचा भर आहे. भाजपच्या ताब्यातील 18 पैकी आठ महापालिकांमधील महापौर-उपमहापौरांनी सव्वावर्षाचा कालावधी पूर्ण केला आहे. या काळात फारशी चमकदार कामगिरी करता आली नसल्याचे काही नेत्यांची ओरड आहे. त्यामुळे बहुतांशी महापालिकांमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न भाजप नेते करीत आहे. मात्र, त्यावरून नाराजी उफाळून येण्याची भीती असल्याने बदल केला जात नाही. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
 
त्यावर भिमाले म्हणाले, ""पिंपरी-चिंचवड महापालिकेत सगळी पदे एका वर्षापुरतीच ठरविण्यात आली होती. त्यातून तेथील महापौर आणि उपमहापौरांचा राजीनामा झाला आहे. त्यामुळे पुण्यात बदल होतील, असे नाही. पुण्यासंदर्भातील पक्षाचे धोरण वेगळे आहे. कोणतेही बदल होणार नसल्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी सांगितले. त्यामुळे बदलाची चर्चा निरर्थक आहे. येथील पदाधिकारी अडीच वर्षांसाठी नेमले आहेत.'' 

संबंधित लेख