No celebrations because of drought condition : Raosaheb Danve | Sarkarnama

दुष्काळी परिस्थितीमुळे सरकारच्या वर्षपूर्ती सोहळा नाही : रावसाहेब  दानवे 

 भास्कर बलखंडे   
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक उभे करण्यासाठी भाजपा सरकारने चार वर्षांत सर्व परवानग्या मिळवून, आराखडा तयार करून वर्क ऑर्डरही दिली आहे.  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल येथील भव्य आंतरराष्ट्रीय स्मारकाचे काम प्रगतीपथावर आहे. 

-रावसाहेब दानवे

जालना : " मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पार्टीच्या राज्य सरकारने चार वर्षांत यशस्वी कामगिरी केली आहे. राज्याला निराशेतून बाहेर काढून प्रगतीच्या मार्गावर आणले आहे.सरकारच्या योजना लोकापर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केल्या जात आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे यावर्षी सरकारच्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा केला जाणार नाही , " अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी दिली . 

 राज्य सरकारला 31 ऑक्टोबर 2018 रोजी चार वर्षे पूर्ण करत आहे. याबाबत श्री.दानवे प्रतिक्रिया देतांना म्हणाले की, "राज्यात शेकडो गावांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती असल्याने संघटनेतर्फे सरकारच्या वर्षपूर्तीचा उत्सव साजरा केला जाणार नाही.चार वर्षांपूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारच्या राजवटीला कंटाळलेल्या जनतेने भाजपाला कौल दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने शेती, ग्रामविकास, शहरांचा विकास, शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय, उद्योग, कायदा -सुव्यवस्था अशा सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. "

" पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे केंद्र सरकार हिमालयाप्रमाणे महाराष्ट्राच्या पाठीशी उभे राहिले आहे. काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या पंधरा वर्षांच्या कामापेक्षा खूप जास्त विकास कार्य भाजपाच्या सरकारने चार वर्षांत केले आहे. रा त्यामुळेच गेल्या चार वर्षांत महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायती अशा सर्व निवडणुकात भाजपा पहिल्या नंबरवर राहिला आहे." असा दावा श्री . दानवे यांनी केला . 

शेतीवरील खर्च दुप्पट 
श्री . दानवे पुढे म्हणाले ," सरकारने शेतीवरील खर्च दुप्पट केला असून कर्जमाफी, पीकविमा, आपत्ती निवारण व अडतमुक्ती अशा विविध प्रकारे शेतकऱ्यांना 51 हजार कोटी रुपयांची मदत केली आहे.सोळा हजार गावांत यशस्वी जलयुक्त शिवार योजना, दुधाच्या खरेदी दरात वाढ अशी अनेक कामे सरकारने केल्याचे ते म्हणाले. चार वर्षांत 60 लाख शौचालये बांधून महाराष्ट्र हगणदारीमुक्त केला.."

 

संबंधित लेख