No Bus Stands Developed in Last 50 Years | Sarkarnama

50 वर्ष्यात बसस्थानकाचे एकही काम झाले नाही : दिवाकर रावते

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 20 ऑगस्ट 2018

कऱ्हाडच्या नवीन बसस्थानकाच्या इमारतीची पाहणी मंत्री रावते यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. या वेळी शिवसेनेचे नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, रामभाऊ रैनाक, आरटीओ अजित शिंदे, एसटीचे विभाग नियंत्रक सागर पळसुले, तसेच अधिकारी उपस्थित होते.

कऱ्हाड :  "पन्नास वर्षात राज्यात बसस्थानकाचे एकही काम झालेले नाही. आमच्या काळात राज्यात सध्या २०० ठिकाणी बसस्थानकांची कामे सुरु आहेत. सर्व बसस्थानक आवारात डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कामांना थोडा विलंब होत आहे. बसस्थानकाचे काम येत्या तीन महिन्यात पूर्ण होईल,'' असा विश्वास परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दिला.

कऱ्हाडच्या नवीन बसस्थानकाच्या इमारतीची पाहणी मंत्री रावते यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. या वेळी शिवसेनेचे नितीन बानुगडे-पाटील, जिल्हाध्यक्ष हर्षद कदम, रामभाऊ रैनाक, आरटीओ अजित शिंदे, एसटीचे विभाग नियंत्रक सागर पळसुले, तसेच अधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रावते म्हणाले, "बसस्थानक आवारात डांबरीकरण केल्यामुळे अनेकदा खड्डे पडतात. त्यासाठी दर दोन वर्षांनी खर्च करावा लागतो. अनेक ठिकाणी प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे मी तो निर्णय बदलला असुन यापुढे राज्यातील सर्व बसस्थानकात आता डांबरीकरणाऐवजी सिमेंट कॉक्रीटीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुढील १५-२० वर्षे बघायला लागणार नाही. त्यातुन कायमचा त्रास कमी होणार आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ''राज्यातील १४ ठिकाणी बसपोर्ट करण्यात येणार आहेत. ते इंटरनॅशनल टेंडर असुन त्याव्दारे दर्जेदार सुविधा संबंधित ठिकाणी उपलब्ध करण्यात येणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी व्यावसायिक गाळ्याऐवजी प्रवाशांच्या सेवेवर आमचा भर आहे. अधिस्विकृती धारक पत्रकारांना शिवशाहीतुन प्रवासासाठी माझ्या खात्याने मान्यता दिली आहे. त्याचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेतला जाईल. त्याला थोडा वेळ लागला आहे. मात्र, ते होईल अशी मला खात्री आहे." 

रावतेंनी घेतली तीन जिल्ह्याची बैठक
सातारा, सांगली, कोल्हापुर जिल्ह्यातील कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची बैठक येथील एका हॉटेलमध्ये मंत्री रावते यांच्या उपस्थितीत बैठक झाली. त्यामध्ये पक्षाची पुढील निवडणुकीसंदर्भात संघटना बांधणी, त्यांच्या समस्या, त्यावरील कार्यवाही, पुढील निवडणुकांसाठीची रणनिती या अनुषंगाने त्यामध्ये चर्चा झाली.
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख