no alahabad is prayagraj | Sarkarnama

अलाहाबाद नव्हे "प्रयागराज' 

वृत्तसंस्था
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

लखनौ : उत्तर प्रदेश सरकारने आज ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या अलाहाबाद शहराचे नाव "प्रयागराज' करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. आज राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

पुढील वर्षी जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्‍वभूमीवरच हा निर्णय घेण्यात आल्याने विरोधी पक्षांनी योगी सरकारवर टीका केली आहे. अलाहाबादला आता "प्रयागराज' असे म्हणताना मला आनंद होतो आहे, असे सूचक उद्‌गार मंत्री सिद्धार्थनाथ सिंह यांनी पत्रकारांशी बोलताना काढले. 

राज्य सरकारच्या या निर्णयाची अंमलबजावणी आजपासून होणार आहे. बदलाची एक प्रक्रिया असते, कारण सगळ्याच गोष्टींमध्ये पहिला बदल हा सरकारी विभागांना करावा लागतो. यासंबंधीचे पत्र केंद्रीय संस्था आणि संघटनांना देखील लिहिले जाणार असून, त्यानंतर बदलाची प्रक्रिया पुढे जाईल, असेही त्यांनी नमूद केले. 

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मात्र या निर्णयावर टीका केली असून, कॉंग्रेसनेही त्याला विरोध केला आहे. ज्या ठिकाणी कुंभमेळा होतो त्या जागेला प्रयागराज असेच नाव आहे. सरकारला एवढेच वाटत होते तर त्यांनी वेगळे शहर निर्माण करायचे असते. 
 
संबंधित लेख