nivedita mane about loksabha election | Sarkarnama

मी अजून मैदान सोडलेले नाही : निवेदिता माने

सुनील पाटील
गुरुवार, 20 सप्टेंबर 2018

स्वत:च्या मतदारसंघासाठी त्यांनी आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी मिळते जुळते घेतले आहे!

कोल्हापूर :  स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्यांना लोक धडा शिकवतील. स्वत:च्या मतदारसंघासाठी त्यांनी आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीशी मिळते जुळते घेतले आहे. खासदारकीसाठी अनेकजण इच्छुक आहे. पण आम्हीही मैदान सोडलेले नाही, असा इशारा माजी खासदार माने यांनी दिला.

रूकडी (ता. हातकणंगले) येथील एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत म्हणाले, काहीजण शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून स्वत:चा स्वार्थ साध्य करत आहे. पण हा स्वार्थीपण चालू देणार नाही. तर, हातकणंगलेमधील पुढील खासदार हा बहुजन समाजातील असणार आहे. लोकही विद्यमानांची जागा दाखवून देतील. 

जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धैर्यशील माने, सरपंच रफी कलावंत उपस्थित होते.  

संबंधित लेख