nitishkumar | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

16 दिवसानंतर मराठा आंदोलन मागे, गिरीष महाजनांची शिष्टाई फळाला

"जेडीयू'चा आता ग्रामीण भागावर फोकस

संजीव भागवत: सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 27 एप्रिल 2017

मुंबई : जनता दल युनायटेडच्या महाराष्ट्र प्रदेशकडून शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील पक्ष बांधणीवर फोकस ठेवला जाणार आहे, राज्यात जनता दलाची दोन दशकांपूर्वी असलेली राजकीय आणि संस्थात्मक ताकद लक्षात मराठवाडा, विदर्भ, खानदेश आदी पट्टयातील सुरुवातीला पक्ष बांधणी करण्यासाठी जनता दल युनायटेडच्या प्रदेश कार्यकारिणीने राज्यव्यापी कार्यक्रम तयार केला आहे. 

या कार्यक्रमात शहरी आणि ग्रामीण विकासातील विषमता आणि शेतकरी, कष्टकरी, कामगार, कंत्राटी कामगार , कष्टकरी महिला, सरकारी, निमसरकारी महिला कर्मचारी आदी प्रश्नावर भर देण्यात आला असल्याची माहिती राज्य प्रमुख व आमदार कपिल पाटील यांनी ' सरकारनामा' बोलताना दिली. 

राज्यात विविध राजकीय पक्षाकडून शेतकरी, कष्टकरी, कंत्राटी कामगार, आदींची प्रश्न गांभीर्याने न घेता केवळ आपल्या राजकीय स्वार्थापुरतेच हाताळले आणि अर्धवट सोडून दिले. यामुळे राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला आदींचे असंख्य प्रश्न गंभीर बनले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व घटकांना न्याय देण्याची, त्यांना सक्षम राजकीय पर्याय देण्याची आणि सर्व समाजाला एकत्र घेऊन जाण्याची ताकद ही केवळ जनता दल युनायटेड या पक्षात आहे हे आता स्पष्ट झाले आहे. यामुळे राज्यात पक्ष बांधणी करताना शहरी, ग्रामीण, औधोगिक, शैक्षणिक आणि आर्थिक विषमता यावर प्रामुख्याने भर दिला जाणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली. 

दरम्यान, मुंबईत नुकत्याच झालेल्या पक्षाच्या सभेत जनता दल युनायटेडचे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांनी बिहारच्या शहरी, ग्रामीण आणि औद्योगिक मॉडेल आणि त्याच्या विकासावर भर देत सर्व समाजवादी पक्ष संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले होते, त्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्ष बांधणी करताना समाजवादी विचारांची एक मोठी ताकद निर्माण केली जाणार असल्याचेही कपिल पाटील यांनी सांगितले. 

संबंधित लेख