महेशदादा हे माझे नेते नाहीत, तर मित्र - नितीन काळजे

महेशदादा हे माझे नेते नाहीत, तर मित्र - नितीन काळजे

पिंपरी : भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे हे आपले नेते नसून मित्र आहेत.तसेच त्यांच्यासह शहराचे कारभारी असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनीही आपल्या कारभारात कधी ढवळाढवळ केली नाही, असे पिंपरी-चिंचवडचे महापौर नितीन काळजे यांनी सांगितले आहे. दररोज सरासरी सात याप्रमाणे एका वर्षात अडीच हजार कार्यक्रमांना हजेरी लावणारा पालिकेच्या इतिहासातील मी पहिला महापौर असल्याचा दावाही त्यांनी केला. 

राष्ट्रवादीची सत्ता जाऊन गेल्यावर्षी भाजप पिंपरी पालिकेत प्रथमच सत्तेत आला. काळजे हे या पक्षाचे पहिले महापौर झाले. निवडणुकीमुळे त्यांचे पहिले बजेट गेल्यावर्षी आर्थिक वर्ष सुरू झाल्यानंतर सादर झाले. ते विनाचर्चा मंजूर झाले होते. तीच एकमेव वाईट घटना वर्षात घडली. बाकीच्या चांगल्या खूप आहेत, असा आपल्या वर्षभरातील कामगिरीचा लेखाजोगा काळजे यांनी मांडला. ही खंत व्यक्त करताना यावेळी,मात्र बजेटवर चर्चा करून ते मंजूर करणार आहे, हे सांगण्यास ते विसरले नाहीत.भाजपमधील गटातटाचा फटका अद्याप,तरी बसलेला नाही,असे त्यांनी सांगितले. पदावर राहिलो,तर शहराच्या वाहतुकीत आणि पाणीपुरवठ्यात सुधारणा करण्यावर भर राहील,असे ते म्हणाले. 

2019 च्या तयारीचा भाग म्हणून या निवडणुकीतील इच्छूकांनी आतापासूनच तयारीला सुरवात केली आहे.त्याचा एक भाग म्हणून मावळमधील लोकसभेचे उमेदवार आणि पिंपरी-चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी परवा पालिकेची वर्षभरातील कामगिरी मांडली. तिचे सादरीकरण पिंपरी पालिकेचे सभागृहनेते एकनाथ पवार यांनी केले. ते भोसरी विधानसभेचे मागील निवडणुकीतील उमेदवार आहेत. तसेच 2019 च्या विधानसभेसाठी पुन्हा इच्छूक आहेत. कारभारी भाऊंचे ते खंदे समर्थत आहेत. त्यानंतर काल लगेचच भोसरीतून इच्छूक असलेले महेशदांदांचे पाठीराखे आणि महापौर यांनीही आपले रिपोर्ट कार्ड सादर केले.त्यावेळी बोलताना त्यांनी आपल्या नेत्याचा उल्लेख मित्र असा केला. 

परवा पालिकेतील सत्तापूर्तीचा आलेख मांडताना ठळक एक डझन कामे केल्याचा दावा करण्यात आला होता.त्यात काही कामे जुनी तर बाकी केंद्राची होती. तोच कित्ता महापौरांनीही गिरविला. वर्षभरात 80 कामे केल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ही कामे पालिकेच्या नित्य योजनातील असल्याची कबुलीही त्यांनी शेवटी दिली आहे.त्यात बैठका आयोजित करणे, त्यांना उपस्थिती याचाही समावेश आहे.राज्य शासनाने शास्तीकरात दिलेली सवलत,राष्ट्रवादीच्या काळातील उड्डाणपूलाचे उदघाटनही त्यात आहेत. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com