Nitin Gadkary Helped to cook Khichadi | Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

सांगलीची जागा मतभेद असतील तर आम्हाला नको : राजू शेट्टी. जागा काँग्रेसकडेच ठेवण्याचे संकेत

....अन् नितीन गडकरींनी शिजवली खिचडी

सरकारनामा ब्युरो
रविवार, 14 ऑक्टोबर 2018

काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याने नितीन गडकरी वादात सापडले होते. त्यांच्या काही वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्‌विट केल्याने नितीन गडकरी यांना सावध पवित्रा घ्यावा लागला. राज्यातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज 3 हजार किलो खिचडी शिजविण्याचा 'विश्‍वविक्रम' केला. हा विश्‍वविक्रम पाहण्यासाठी नितीन गडकरी गेले होते. 

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात खिचडी शिजविली. खिचडी शिजविल्यानंतर प्रश्‍न विचारल्यानंतर मात्र त्यांनी पत्रकारांची डाळ शिजू दिली नाही. 

काही दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याने नितीन गडकरी वादात सापडले होते. त्यांच्या काही वक्तव्यावर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही ट्‌विट केल्याने नितीन गडकरी यांना सावध पवित्रा घ्यावा लागला. राज्यातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आज 3 हजार किलो खिचडी शिजविण्याचा 'विश्‍वविक्रम' केला. हा विश्‍वविक्रम पाहण्यासाठी नितीन गडकरी गेले होते. 

यावेळी नितीन गडकरी यांनीही पातेल्यात खिचडी शिजविण्यासाठी मदत केली. विष्णू मनोहर यांची खिचडी तर शिजली. त्यानंतर नितीन गडकरींना प्रश्‍न विचारण्यासाठी पत्रकार सरसावले. परंतु, गडकरी यांनी पत्रकारांच्या कोणत्याही प्रश्‍नाला उत्तर दिले नाही. पत्रकारांनी आजचा ताजा विषय केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांच्या राजीनाम्याच्या वृत्ताबद्दलही विचारणा करून पाहिली. परंतु, त्यावरही कोणतेही उत्तर न देता गडकरी यांनी दुसऱ्या कार्यक्रमाला जाणे पसंत केले. गडकरींसमोर डाळ न शिजल्यानंतर अखेर पत्रकारांनाही फक्त खिचडी खाण्याशिवाय कोणताही पर्याय राहिला नाही.

संबंधित लेख