गडकरींमध्ये 'पीएम मटेरिअल' : पृथ्वीराज चव्हाण

भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याचे 'मटेरियल' असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी "सकाळ'ला सदिच्छ भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीपासून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबतही आपले रोखठोक मत व्यक्त केले.
Nitin Gadkary Prithviraj Chavan
Nitin Gadkary Prithviraj Chavan

नागपूर : भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री यांच्यामध्ये पंतप्रधान होण्याचे 'मटेरियल' असल्याचे मत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी येथे व्यक्त केले. पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी "सकाळ'ला सदिच्छ भेट दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीपासून तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्याबाबतही आपले रोखठोक मत व्यक्त केले.

नरेंद्र मोदी यांना नितीन गडकरी पर्याय होऊ शकतात काय? या प्रश्‍नावर चव्हाण यांनी गडकरींमध्ये पंतप्रधानपदासाठी लागणारे मटेरिअल असल्याचे सांगितले. त्यांच्यामध्ये धडाक्‍यात कामे करण्याची क्षमता आणि सर्वांसोबत उत्तम संवाद साधण्याचे कौशल्य आहे, असे चव्हाण म्हणाले. 

शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची फारशी अडचण नसताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाच्या विकासाची चांगली संधी गमावली असल्याचे मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. दोन्ही काँग्रेस एकत्र येणार असल्याने पुन्हा भाजपला संधी मिळण्याची शक्‍यता कमीच असल्याचे भाकीतही त्यांनी वर्तविले. 

''पश्‍चिम महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आजवर विदर्भ असो वा मराठवाडा असा दुजाभाव केला नाही. शरद पवार मुख्यमंत्री असताना त्यांचे एकछत्री राज्य होते. बहुमत असल्याने त्यांचा निर्णय अंतिम असायचा. युती आणि त्यानंतर आघाडीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांना काम करण्यास फारसे स्वातंत्र्य मिळाले नाही. सर्वांना सोबत घेऊन चालायचे असल्याने अनेक तडजोडी कराव्या लागल्या. तुलनेत देवेंद्र फडणवीस यांना काम करण्याची चांगली संधी मिळाली. शिवसेना सत्तेत सहभागी असली तरी त्यांनी कामात अडथळे आणले नाहीत. राज्यात भाजपचेच सरकार असल्याने मुख्यमंत्र्यांना विदर्भात औद्योगिक विकास करता आला असता. विदर्भाच्या विकासासाठी त्याशिवाय दुसरा पर्यायसुद्धा नाही. सिंचनाचा अनुशेषही फारसा भरून निघाला नाही. यामुळे त्यांनी विदर्भ विकासाची संधी दवडली असेच म्हणावे लागले,'' असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. 

मोदींविरुद्ध भाजपमध्ये प्रचंड असंतोष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीबद्दल बोलताना चव्हाण म्हणाले, "नरेंद्र मोदी यांचा स्वभाव, हुकूमशाही वृत्तीमुळे त्यांच्याच मंत्रिमंडळातील जवळपास सर्वच सहकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवकसंघसुद्धा नाराज आहे. ते कोणालाच विश्‍वासात घेत नसल्याने आगामी निवडणुकीपूर्वी भाजपचा एखादा बडा नेता पक्षातून बाहेर पडू शकतो, इतका असंतोष भाजपमध्ये आहे." 

यूपी, बिहार निर्णायक ठरणार
''मोदींच्या सुडाच्या राजकारणामुळे सर्वच पक्षांतील नेते भयभीत आहेत. आगामी निवडणुकीत जागा कमी-जास्त मिळाल्या तरी चालेल; मात्र मोदी पुन्हा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर बसू नये याकरिता सर्व एकत्र येत आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहारची निवडणूकच भाजपचे बहुमताचे गणित बिघडवू शकते. कॉंग्रेसला 145 जागा मिळतील अशी आशा आहे,'' असा दावा चव्हाण यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com