Nitin Gadkari's 61st birthday celebration | Sarkarnama

नागपूर भाजप गडकरींना एकसष्टीनिमित्त 61 लाखांची थैली देणार 

सरकारनामा ब्युरो
रविवार, 7 मे 2017

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम नागपुरात भव्य प्रमाणात साजरा केला जाणार असून नागपूर भाजपचे कार्यकर्ते कामाला लागला आहेत. या सत्कारावेळी गडकरींना 61 लाख रुपयांची थैली दिली जाणार आहे. 

नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांच्या एकसष्टीचा कार्यक्रम नागपुरात भव्य प्रमाणात साजरा केला जाणार असून नागपूर भाजपचे कार्यकर्ते कामाला लागला आहेत. या सत्कारावेळी गडकरींना 61 लाख रुपयांची थैली दिली जाणार आहे. 

विदर्भात भारतीय जनता पार्टीचे जाळे विणण्यात मोठे योगदान देणारे नितीन गडकरी यांना मानणारे प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ते आहेत. येत्या 27 मे रोजी गडकरी यांचा वाढदिवस असून तो भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे. या सत्कार समारंभासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जातीने हजर राहणार आहेत. 

नागपूर शहर भाजपने या सत्कार समारंभाची जय्यत तयारी सुरू केली आहे. नागपूर शहरातील सर्वांत मोठे मैदान असलेल्या कस्तुरचंद पार्कवर हा सोहळा होणार आहे. शहराच्या मध्यवर्ती असलेल्या या पार्कवर कोणतेही कार्यक्रम घेण्यास उच्च न्यायालयाने मनाई केली आहे. उच्च न्यायालयाच्या या मनाई हुकुमानंतरही शहर भाजपने मात्र कार्यक्रम कस्तुरचंद पार्कवरच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. 

गडकरी यांच्या एकसष्टीनिमित्त शहर भाजपतर्फे 61 लाख रुपयांची थैली जाणार आहे. ही रक्कम जमा करण्यासाठी नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे प्रयत्न करीत आहेत. गडकरी यांची एकसष्टी मोठ्या व भव्य प्रमाणात साजरा करण्याची योजना आखली तरी या कार्यक्रमावर अधिक खर्च करू नये, असे निर्देश "वाड्या'वरून दिल्याचे समजते. शेतकऱ्यांची कर्जमाफी व तूर डाळ प्रकरणामुळे विरोधक आक्रमक झालेले असताना एकषष्ठीचा कार्यक्रमावरून टीका होण्याची शक्‍यता आहे. यापूर्वी गडकरींच्या मुलाच्या लग्नात झालेल्या वारेमाप खर्चावरून प्रसार माध्यमांमधून टीका झाली होती.

संबंधित लेख