राज ठाकरे यांनी माहिती घेऊन बोलावे ः नितीन गडकरी यांचा टोला

राज ठाकरे यांनी माहिती घेऊन बोलावे ः नितीन गडकरी यांचा टोला

नवी दिल्ली  : नितीन गडकरी फक्त आकडे फेकतात, .अशी टिपण्णी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच केली होती. त्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज यांनी स्पष्ट उत्तर दिले आहे.

`मी काय काम करतो आणि त्यात चुका काय होतात, याची माहिती घेण्यासाठी अनेक मिडियावाले बसले आहेत. त्यामुळे माझ्या वक्तव्यांबाबत मी जागरूक असतो. वाहतूक मंत्रालयाने केलेल्या सर्व कामांची यादी ठाकरे यांना पाठविण्यास मी तयार आहे. त्यांनी शोध घ्यावा आणि मग विधाने करावीत. उगाच काही बोलू नये,` असेही गडकरी यांनी `सरकारनामा`शी बोलताना बजावले.

`सरकारनामा`शी बोलताना त्यांनी विविध विषयांवर मते व्यक्त केली. पुण्यासारख्या शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी ई- बस आवयक आहेतच, त्यांचे लाईफ कमी असले तरी इंधनाचा खर्च प्रती किलोमीटर 27 रुपयेच खर्च येतो. त्यामुळे हा स्वस्तातील पर्याय तातडीने स्वीकारला पाहिजे, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा ई-बसची पाठराखण केली.
 
ते म्हणाले, ""ई- बसची ऑपरेटींग कॉस्ट डिझेल आणि सीएनजीच्या तुलनेत कमी आहे. मुंबईतही ई-बसच्या खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. त्या बाबत विनाकारण बागूलबुवा केला जात आहे. ई- बसची किंमत जास्त असली तरी, इंधनाच्या खर्चात होणाऱ्या बचतीमधून जादा किंमत भरून काढता येते. त्यामुळे ई - बस आवश्यक आहेतच.''

पुणे महापालिकेतील एक लॉबी डिझलेच्या बस खरेदीबाबत आग्रही आहे. त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ई- बसच खरेदी करण्याचा आदेश पीएमपीच्या संचालक मंडळाला दिला आहे. या पार्श्‍वभूमीवर गडकरी यांनी ई- बससाठी पाठपुरावा केला आहे. त्यामुळे आता पीएमपीसाठी आता 500 ई- बस भाडेतत्त्वावर घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे


हा तर पुणे महापालिकेचा प्रॉब्लेम ! 

चांदणी चौकातील नियोजीत उड्डाण पुलाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. त्याला आठ महिने उलटले तरी अद्याप त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या कडे त्यांचे लक्ष वेधले असता, भूसंपादनातील संरक्षण खात्याचा प्रश्‍न होता तो सुटला आहे. आता महापालिकेला भूसंपादन जमत नसेल तर मी काय करणार ? त्यासाठीचा निधी तयार आहे. निविदा झाली आहे. काम सुरू झाले आहे. जर भूसंपादन करणे जमत नसेल तर, हा महापालिकेचा प्रॉब्लेम आहे. त्याला मी काय करणार ? महापालिका आयुक्ताला या बाबत खडसावून विचारले पाहिजे, अशीही स्पष्टोक्ती गडकरी यांनी केली. 

सातारा रस्ता 90 दिवसांत होणार 

पुणे- सातारा रस्ता, कात्रज- देहूरोड बाह्यवळण रस्त्याचा प्रश्‍न अजूनही सुटलेला नाही. या रस्त्याचे काम रिलायन्सला दिले असल्यामुळे त्याच्यावर कारवाई होत नाही, असे आरोप होत असल्याचे गडकरी यांच्या निदर्शनास आणले. तेव्हा त्यांनी , "कंत्राटदाराने काम वेळेत केले पाहिजे, असे त्याला बजावण्यात आले आहे. आवश्‍यकतेनुसार त्याच्यावर कारवाईही झाली आहे आणि होईल. या रस्त्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित काम 90 दिवसांत पूर्ण होईल, अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com