nitin gadkari nagpur vidarbha | Sarkarnama

ऑगस्ट क्रांतीदिनापासून विदर्भवादी संघटनांचाही "भाजप सरकार चले जाव'चा नारा

सरकारनामा ब्युरो
मंगळवार, 25 जुलै 2017

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनासाठी येत्या ऑगस्ट क्रांतीदिनापासून विदर्भवादी पुन्हा ढोल वाजविणार आहेत. पहिला ढोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर बडविला जाणार आहे. यावेळी "भाजप सरकार चले जाव'चा नारा बुलंद केला जाणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने हे आंदोलन आयोजित केले आहे. 

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनासाठी येत्या ऑगस्ट क्रांतीदिनापासून विदर्भवादी पुन्हा ढोल वाजविणार आहेत. पहिला ढोल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर बडविला जाणार आहे. यावेळी "भाजप सरकार चले जाव'चा नारा बुलंद केला जाणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीने हे आंदोलन आयोजित केले आहे. 

स्वतंत्र विदर्भ व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांवर हे आंदोलन केले जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून भाजपने स्वतंत्र विदर्भ व शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्याने विदर्भाची प्रगती खुंटली असल्याचा आरोप विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या बैठकीत करण्यात आला. आता विदर्भातील खासदारांच्या घरासमोर ढोल वाजविण्याचे आंदोलन केले जाणार आहे. 

विदर्भात भाजपचे आठ तर शिवसेनेचे 4 खासदार आहेत. येत्या 9 ऑगस्टला क्रांती दिनानिमित्त विदर्भ राज्य आंदोलन समिती आंदोलन करणार आहे. या आंदोलनाची सुरूवात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर ढोल वाजवून केली जाणार आहे. गडकरी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे बहुमत आल्यास स्वतंत्र विदर्भ होईल, असे प्रतिज्ञापत्रावर लिहून दिले होते. 

विदर्भवाद्यांनी पहिल्यांदा गडकरी यांच्या घरासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सरकारने शेतकऱ्यांचीही फसवणूक केली आहे. शेतमालांना उत्पादन खर्चाच्या दीडपटीने भाव देण्याचे जाहीर केले होते. परंतु या आश्‍वासनाचाही विसर भाजपला पडला आहे. याची आठवण करून देण्यासाठी "भाजप सरकार चले जाव'चा नारा दिला जाणार आहे. या आंदोलनानंतर येत्या 28 सप्टेंबर विदर्भ करार व केळकर समितीच्या अहवालाची होळी करणार आहे. महाराष्ट्रात सामील होण्याचा विदर्भ करार 28 सप्टेंबर 1953 रोजी झाला होता. यासाठी येत्या 28 सप्टेंबरला या कराराची होळी केली जाणार असल्याचे विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी सांगितले. 
 

संबंधित लेख