विकासामध्ये जातीयवादाचे विष कालवू नका - नितीन गडकरी

 विकासामध्ये जातीयवादाचे विष कालवू नका - नितीन गडकरी

नांदेड : माणूस जातीने नाही तर गुणाने मोठा होतो. विकास झाला तरच गरिबी दूर होईल. वीज, पाणी व दळणवळण जिथे असेल तिथे रोजगार निर्मिती होते. सर्वांगिण विकासाला मुख्यमंत्र्यांनी जपावे. विकासाचा संबंध जात, भाषा, नाते यांच्याशी नसतो. विकासाच्या कामात जातीयवादी विष कालवू नका, अशा शब्दात केंद्रीय भूतल परिवहन, जहाज बांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी विरोधकांवर खोचक टिका केली. 

लोहा (जि. नांदेड) येथे राष्ट्रीय महामार्गांवरील भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गुरूवारी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, कामगारमंत्री संभाजी निलंगेकर, आमदार डॉ. तुषार राठोड, विनायकराव पाटील, सुधाकर भालेराव, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकर, माजी आमदार किशनराव राठोड, गणेश हाके, गोविंदराव केंद्रे, प्रविण पाटील चिखलीकर आदींची उपस्थिती होती. लोहा कंधारचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. 

श्री. गडकरी म्हणाले की, चुकीच्या नेतृत्वामुळे व चुकीच्या अर्थिक धोरणामुळे महाराष्ट्र व्हिजन लेस बनला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे जात आहेत. गरिबीला जात नसते साखर मुस्लिमाला वेगळा भाव तर हिंदूला वेगळा भाव असं काही नसत. 

ते म्हणाले की जो ज्या जातीचा असतो तो त्या जातीचा कधीच असत नाही. जातीचा वापर करत आपल्या बायको, मुलासाठी काहीजण तिकीट मागतात. काही लोक तर मोदी, फडणवीस आणि आमच्यामुळे बेरोजगारी निर्माण झाली, अशी टीका करतात, विरोधकांची खिल्ली उडवत त्यांनी आपल्या भाषणात टाळ्या घेतल्या. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com