nitin gadakri warns officials | Sarkarnama

गडकरींनी असा दम भरला की काही मिनिटांतच work order निघाली....

अश्विनी जाधव-केदारी
रविवार, 23 डिसेंबर 2018

पुणे ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा दरारा भलताच असतो. त्यांनी एखादे काम मनावर घेतले आणि झाले नाही,असे शक्यतो होत नाही. तरीही पुण्यात त्यांची मात्रा चालत नव्हती. त्यांच्या हस्ते पुण्यातील चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊनही काम सुरू झालेले नव्हते. त्यामुळे गडकरी यांच्याच कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित होत होता. मात्र गडकरी यांनी पुण्यात दौऱ्यात येण्यापूर्वीच अधिकाऱ्यांना अशी काही ताकद दिली की ते पुण्यात येण्यापूर्वीच वर्क आॅर्डर निघाली.

त्याचा किस्सा स्वतः गडकरी यांनी पुण्यात सांगितला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त पुण्यातील नूमवि प्रशालेत आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते शिबिराचे उदघाटन झाले.

पुण्यात येण्यापूर्वी पुणेकरांसाठी कबूल केलेल्या कामांची कागदोपत्री पूर्तता व्हायला हवी याबाबत उल्लेख करतान गडकरी म्हणाले की पुण्यात येण्यापूर्वी माझ्या मनात एक गोष्ट होती की, चांदणी चौकातील पुलाचे काम सुरू झाले नव्हते. कारण त्याकरिता लागणारी जमीन अधिग्रहण झाली नव्हती. 80 टक्के पैसे मिळाल्याशिवाय काम सुरू करणार नाही, अशी भूमिका ठेकेदाराने घेतली होती. पण माझा पुणे दौरा निश्चित झाला तेव्हा माझ्या अधिकाऱ्यांना ताकिद दिली की, मी पुण्यात जाण्यापूर्वी ठेकेदाराला वर्क ऑर्डर मिळाली पाहिजे आणि त्यानंतर काही वेळातच वर्क ऑर्डर त्याला मिळाली. उद्यापासून त्या कामाची जोरात सुरवात होईल.त्यामुळे पुण्याकरता कबूल केलेली सर्व कामे मी पूर्ण करतोय असं देखील गडकरी यांनी आवर्जून सांगितले. तसेच संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे काम जानेवारी महिन्यात सुरु करणार येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

भाजप नगरसेवक हेमंत रासने यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात नितीन गडकरी यांचा सत्कार करताना पुष्पगुच्छासह, 'घड्याळ' ही सप्रेम भेट देण्यात आले, अर्थात गडकरींना देण्यात आलेल्या 'घड्याळ' भेटीची उपस्थितांमध्ये चर्चा न झाल्यास नवलच! घड्याळ भेट दिले असले तरी त्या घड्याळावर भाजपच्या 'कमळ' पक्षाचीच खूण आहे याचीही खुसखुशीत चर्चा कार्यक्रमात रंगली.
 
संबंधित लेख