nitin banugade patil reaction about sangli election | Sarkarnama

#SangliResult भाजपचा विजय EVM मुळे : नितीन बानुगडे पाटील 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 3 ऑगस्ट 2018

सातारा :सांगली महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 10 ते 12 जागा जिंकण्याचा विश्वास होता. पण अनपेक्षित निकाल लागला. त्याचेच आम्ही आत्मचिंतन करत आहोत. पण हा धनशक्तीचा आणि ईव्हीएमचा विजय आहे, असे मत शिवसेनेचे सातारा-सांगली जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील यांनी "सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले. 

सांगली महापालिका निवडणूक शिवसेनेने प्रथमच लढली. यामध्ये आम्ही 56 जागावर उमेदवार उभे केले होते, असे सांगून बानुगडे पाटील म्हणाले, आम्ही या निवडणुकीत आमचा पक्ष आणि चिन्ह लोकांपर्यंत पोचविणें महत्वाचे होते. आम्ही पूर्ण ताकद लावली पण नेमके काय चुकले याचेच आत्मचिंतन आम्ही करत आहोत. साधारण 22 जागा रेसमध्ये होत्या, त्यापैकी दहा ते 12 जागा जिंकू असा विश्वास होता. पण निकाल अनपेक्षित लागला.

आम्ही या निवडणुकीत पहिल्यांदाच उतरलो होतो, पण या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झालो आहोत. याचा आम्हाला आगामी विधानसभा निवडणुकीत निश्‍चित फायदा होईल. आम्ही सांगलीत पाय रोवणे महत्वाचे होते. आगामी काळात जनतेने दिलेला कौल मान्य करून 80 टक्के समाजकारण या महापालिका क्षेत्रात करणार आहोत. आमच्याकडून काही चुका झाल्या असतील त्या सुधारण्याचा आगामी काळात प्रयत्न राहील. पण हा धनशक्तीचा आणि ईव्हीएम मशीच्या माध्यमातुन विजय मिळविला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख