Nitesh Rane targets his opponents | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

राणा जगजितसिंह उस्मानाबादचे राष्ट्रवादीचे उमेदवार : पवारांची घोषणा
सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांचा शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश...

राणे नकोत म्हणून सगळे कावळे सध्या एकत्र झाले आहेत : नीलेश राणे

सरकारनामा
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018

माझा कोणावरही वैयक्‍तिक राग नाही; मात्र विकासकामात आडवे आलेल्यांना धडा शिकवणार.

-नीलेश राणे

रत्नागिरी :  "शिवसेनेत फक्‍त 'गांधीजी' चालतात. पैसे आहेत, त्यांनाच पद दिले जाते. जुने शिवसैनिक वेगळेच होते. त्यांना प्रणाम करावासा वाटतो. त्यामुळे कोणीही चालेल, पण शिवसेनेचा उमेदवार 2019 ला निवडून येणार नाही, अशी शपथ मी घेतली आहे. यादृष्टीने आखणी केली आहे,'' असे मत माजी खासदार नीलेश राणे यांनी शनिवारी व्यक्त केले.

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी त्यांनी खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत यांच्यासह शिवसेनेला लक्ष्य करताना आमदार जाधव यांच्या भेटीतही राजकारण असल्याचा आरोप केला.

ते म्हणाले, "माझा कोणावरही वैयक्‍तिक राग नाही; मात्र विकासकामात आडवे आलेल्यांना धडा शिकवणार. राणे नकोत म्हणून सगळे कावळे सध्या एकत्र झाले आहेत. खासदार राऊतांसह सर्वच जण आमदार भास्कर जाधवांच्या घरी गेले. तेथेही चर्चा झाली ती राजकीय. तब्येत विचारायला गेलेल्या राऊतांकडून ही अपेक्षा नव्हती. बाळासाहेबांबद्दल नको ते बोलणाऱ्यांना पायघड्या घालत ते फिरत आहेत. ते पदासाठी वाट्टेल ते करतील.''

...त्या भाषेतच उत्तर देऊ
"समोरच्याला ज्या भाषेत कळते, त्या भाषेतच उत्तर देण्याची सवय आहे. त्यानुसार चार दिवस शिवसेनेला सळो की पळो केले. तेव्हा शाखा बंद पाडायला लावल्या. मी कोठे जातो याचीच चर्चा होती. ही खरी राणेंची ताकद आहे. कॉंग्रेसमध्ये गार झालो होतो. आता ताकद दाखवू,'' असे नीलेश राणे यांनी ठणकावले.

संबंधित लेख