nitesh rane interview | Sarkarnama

शिवसेनेचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे : नितेश राणे 

गोविंद तुपे 
बुधवार, 7 मार्च 2018

मुंबई ः राजापूर तालुक्‍यातील रिफायणरी प्रकल्पावर शिवसेनेची भूमिका ही दुटप्पीपणाची आहे. त्यामुळे शिवसेने खायाचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे अशी टीका आमदार नितेश राणे यांनी "सरकारनामा'शी बोलताना केली. 

विशेष म्हणजे कोकणात या प्रकल्पाला विरोध करीत शिवसेना रस्त्यावर उतरत असते. मात्र विधानसभेत किंवा परिषदेत कुठलीच भूमिका शिवसेनेने घेतलेली दिसत नसल्याचेही राणे यांनी स्पष्ट केले. 

विधान मंडळाच्या दोन्ही सभागृहात राजापूर तालुक्‍यातील रिफायनरी प्रकल्पाबाबत आलेल्या लक्षवेधी सूचनांमध्ये कोकणातील एकाही शिवसेनेच्या आमदारांचा उल्लेख पहायला मिळत नाही. त्यामुळे शिवसेनेची या प्रकल्पाबाबतची नक्की भूमिका काय हे स्पष्ट होत नसल्याचे नितेश राणे यांनी सांगितले. तसेच शिवसेना जरी दुटप्पी भूमिका घेऊन या प्रकल्पाच्य मुद्द्याचे राजकारण करीत असली तरी आमचा मात्र या प्रकल्पाला विरोधच असणार आहे असेही राणे यांनी स्पष्ट केले.  
 
संबंधित लेख