आजचा वाढदिवस : नितेश राणे, आमदार कणकवली (कॉंग्रेस)

आजचा वाढदिवस : नितेश राणे, आमदार कणकवली (कॉंग्रेस)

दमदार राजकीय वारसा असूनही वेगळे विश्‍व उभारणारा आमदार अशी ओळख नीतेश नारायण राणे यांनी निर्माण केली आहे. स्वाभिमान संघटनेच्या स्थापनेपासून आजपर्यंतचा त्यांचा राजकीय प्रवास राज्यात कायमच चर्चेचा विषय ठरला. शिवसेनेवर घराणेशाहीची टीका करत नारायण राणे 2005 मध्ये कॉंग्रेसमध्ये गेले. 2009 पासून डॉ. नीलेश आणि नीतेश राणे हे दोघेही राजकारणात सक्रिय झाले. डॉ. नीलेश रत्नागिरी मतदार संघातून लोकसभेत गेले. नीतेश राणे यांनी स्वाभिमान संघटनेचा मुंबईबरोबरच राज्यात विस्तार करायला सुरवात केली. रोजगार मेळावा भरवून त्यांनी 25 हजार लोकांना रोजगार मिळवून दिला. त्यांनी मुंबईतील कामगार संघटना विश्‍वात स्थान निर्माण निर्माण करून त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. मुंबई बरोबरच सिंधुदुर्गच्या राजकारणातही ते सक्रिय आहेत. नीतेश राणे राजकारणात सक्रिय झाले त्या काळात सिंधुदुर्गात नारायण राणेंचे संघटन पूर्ण जिल्ह्यात मजबूत होते. आमदार म्हणूनही त्यांचा कार्यकाळ संघर्षमय राहिला. आमदारकी आली पण सत्ता गेली. अशा परिस्थितीत त्यांनी विविध कंपन्यांचा सीएसआर फंड मिळवत कामे केली. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com