Nitesh Rane attacks Shivsena | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

नगरमध्ये डॉ. सुजय विखे जिंकले
रायगडात सुनील तटकरे जिंकले

पेंग्विन गोंजारण्यापेक्षा मुंबईकरांचे जीव वाचवा : नितेश राणे

सरकारनामा
शुक्रवार, 15 मार्च 2019

शिवसेनेची सत्ता असलेली पालिका खरे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

मुंबई : मुंबईत सीएसटी स्थानकाला जोडणारा पूल कोसळून सहा जणांचा बळी गेल्यावर राजकीय आरोपाच्या फैरी झडण्यास सुरुवात झाली आहे. पूल कोसळण्याच्या दुर्घटनेवरून राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

 दुर्घटनेनंतर पालिकेचा ढिसाळ कारभार समोर आला आहे. पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा लोकांच्या जीवाची काळजी करा, अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

 

 

ट्विटरच्या माध्यमातून नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे पेंग्विन प्रेम आणि नाईटलाईफची त्यांनी केलेली मागणी यावरून नितेश राणे यांनी शिवसेनेला टोमणा मारला आहे. 

पेंग्विन गोंजारत बसण्यापेक्षा आणि नाईटलाईफसाठी झगडण्यापेक्षा शिवसेनेची सत्ता असलेली पालिका खरे जीव वाचवण्याचा प्रयत्न का करत नाही, असा सवाल नितेश राणे यांनी केला आहे.

आता पुन्हा तोच आरोप-प्रत्यारोपाचा खेळ आणि पुलाच्या ऑडिटची चर्चा सुरू होईल. याचा परिणाम काहीच होणार नाही, असे ट्विट करून राणेंनी शिवसेनेला घेरले आहे.

संबंधित लेख